जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला होणार?; राष्ट्रीय महामार्गावर हाय अलर्ट

On: May 2, 2025 4:32 PM
Terror Attack Alert
---Advertisement---

Terror Attack Alert | जम्मू-काश्मीर पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून समोर आली आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या भीषण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, जम्मू-काश्मीरमध्ये आता हाय अलर्ट जारी (jammu Kashmir High Alert) करण्यात आला आहे. विशेषतः राष्ट्रीय महामार्गांवर संभाव्य हल्ल्याचा धोका वर्तवण्यात आला आहे.

गुप्तचर यंत्रणांकडून माहिती, सुरक्षेत वाढ :

विश्वसनीय गुप्तचर अहवालानुसार, दहशतवादी जम्मू-काश्मीरच्या राष्ट्रीय महामार्गावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी महामार्गावरील नाकेबंदी, चौक्या आणि जलद प्रतिसाद पथकांची तैनाती वाढवली आहे. संवेदनशील भागांमध्ये सैन्य आणि पोलिसांची गस्त अधिक तीव्र करण्यात आली आहे. (jammu Kashmir High Alert)

22 एप्रिल रोजी अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये (Pahalgam attack) दहशतवाद्यांनी 26 निष्पाप पर्यटकांची हत्या केली होती. या हल्ल्यामागे पाकिस्तानशी संबंध असलेल्या अतिरेक्यांचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या घटनेनंतर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी मोहिमा मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. अनेक ठिकाणी बुलडोझर कारवाईद्वारे दहशतवाद्यांची ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.

Terror Attack Alert | गृहमंत्री अमित शहा यांचा इशारा :

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी या पार्श्वभूमीवर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं, “दहशतवाद्यांनी भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना शोधून शोधून शिक्षा दिली जाईल. हा नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) भारत आहे, इथे दहशतवादाला पळून जाण्याची संधी नाही.”

News Title: Fresh Terror Attack Alert in Jammu-Kashmir; High Alert on National Highway After Pahalgam Incident

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now