EPS 95 Pension Hike | EPS 95 पेन्शनधारकांसाठी केंद्र सरकारकडून एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या या योजनेअंतर्गत लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना केवळ 1000 रुपये किमान पेन्शन मिळते. मात्र, ही रक्कम थेट 7500 रुपयांपर्यंत वाढवण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती समोर आली आहे.
8 वा वेतन आयोग आणि खासगी कर्मचाऱ्यांचा लाभ :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने 8 वा वेतन आयोग स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, त्याच पार्श्वभूमीवर खासगी क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांनाही न्याय मिळावा म्हणून EPS 95 योजनेत बदल होण्याची शक्यता आहे. यासाठी सरकारकडून लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (EPS 95 Pension Hike)
EPS 95 अंतर्गत पेन्शन मिळवणारे नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून किमान पेन्शन वाढवण्याची मागणी करत आहेत. यासाठी आंदोलनं, निवेदनं देखील देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर खासदार बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीनेही पेन्शन रक्कम वाढवण्याची स्पष्ट शिफारस केली आहे.
EPS 95 Pension Hike | पूर्वी 3000 रुपये, आता थेट 7500 रुपयांवर चर्चा :
पूर्वी किमान पेन्शन 3000 रुपये करण्याच्या चर्चा होत्या, मात्र त्या केवळ चर्चापुरत्याच मर्यादित राहिल्या. त्यामुळे पेन्शनधारक नाराज होते. सध्या मात्र 7500 रुपये रक्कम निश्चित करण्यासाठी सरकारवर दबाव वाढला आहे. (EPS 95 Pension Hike)
सद्यःस्थितीत केंद्र सरकारने यावर कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, मात्र प्रसारमाध्यमांद्वारे ही शक्यता व्यक्त केली जात आहे. 8 वा वेतन आयोग आणि वाढती महागाई पाहता, EPS 95 पेन्शनधारकांसाठी ही मोठी दिलासादायक घोषणा लवकरच अपेक्षित आहे.






