EPFO New Rules | केंद्र सरकारच्या EPFO (कर्मचारी भविष्य निधी संघटना) तर्फे चालवल्या जाणाऱ्या EDLI (Employees’ Deposit Linked Insurance Scheme) योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता कर्मचाऱ्याच्या PF खात्यात पैसे नसले तरी, नॉमिनीला किमान ₹50,000 आणि जास्तीत जास्त ₹7 लाखांपर्यंत विमा रक्कम मिळणार आहे.
नव्या EDLI योजनेनुसार काय बदल? :
किमान बॅलन्सची अट रद्द:
आता PF खात्यात किमान रक्कम असणे गरजेचे नाही. पूर्वीच्या नियमानुसार ₹50,000 किमान शिल्लक असावी लागायची.
मृत्यूनंतर 6 महिन्यांतही लाभ मिळणार:
जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू त्याच्या शेवटच्या सॅलरीनंतर ६ महिन्यांच्या आत झाला, तरी त्याच्या नॉमिनीला विमा रक्कम मिळणार आहे.
60 दिवसांचा नोकरीत गॅप मान्य:
दोन नोकऱ्यांमधील 60 दिवसांचा ब्रेकही सेवाकालात धरला जाणार, त्यामुळे सलग १२ महिन्यांचा सेवा अटीवर परिणाम होणार नाही.
EPFO New Rules | EDLI योजना म्हणजे नेमकं काय? :
– ही योजना EPFO अंतर्गत विनाअंशदान चालवली जाते.
– यामध्ये कर्मचारी काहीही भरत नाही, संपूर्ण योगदान कंपनीकडून दिलं जातं.
– विमा रक्कम ₹2.5 लाख ते ₹7 लाखांपर्यंत असते.
कर्मचारी नोकरी करत असताना मृत्यू झाल्यास, त्याच्या कायदेशीर वारसदाराला ही विमा रक्कम मिळते. (EPFO New Rules)
कोणाला होणार सर्वाधिक फायदा? :
– ज्या कुटुंबातील कमावती व्यक्ती अचानक गेली, पण तिच्या PF खात्यात पुरेसा बॅलन्स नव्हता.
– ज्या कर्मचाऱ्यांनी नोकरी दरम्यान थोडा ब्रेक घेतला होता.
– ज्यांनी PF खाते सक्रिय ठेवले होते, पण अचानक मृत्यू झाला.






