पीएफ काढायचाय? थांबा, आधी ‘हे’ वाचा! EPFO ॲपमध्ये झाले मोठे बदल

On: February 13, 2026 7:17 PM
EPFO 3.0 Update
---Advertisement---

PF withdrawal | पीएफ खात्यातील रक्कम काढताना होणारी धावपळ लवकरच संपणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (Employees’ Provident Fund Organisation – EPFO) एप्रिल 2026 पासून अधिकृत मोबाईल ॲप सुरू करण्याच्या तयारीत आहे. या ॲपमुळे पीएफशी संबंधित सेवा बँकिंग ॲपप्रमाणे सहज उपलब्ध होतील आणि यूपीआयद्वारे थेट पैसे काढण्याची सुविधा मिळेल.

नव्या ॲपमधील चार मोठे बदल :

नवीन मोबाईल ॲप सुरू झाल्यानंतर पीएफ सदस्यांना अर्ज, पडताळणी आणि रक्कम मिळण्याची प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे पूर्वीसारखे कागदपत्रांचे ओझे किंवा कार्यालयीन फेऱ्या मारण्याची गरज राहणार नाही. संपूर्ण व्यवहार ऑनलाइन पद्धतीने पार पडणार असल्याने वेळेची मोठी बचत होईल.

या ॲपचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पीएफ शिल्लक दोन स्वतंत्र भागांत दर्शवली जाणार आहे. ‘पात्र शिल्लक’ म्हणजे तत्काळ काढता येणारी रक्कम आणि ‘लॉक बॅलन्स’ म्हणजे राखीव ठेवलेली रक्कम. किमान 25 टक्के निधी कायमस्वरूपी लॉक ठेवण्यात येईल, जो नोकरीदरम्यान काढता येणार नाही. ही सुरक्षित ठेव निवृत्तीनंतरच सदस्यांच्या ताब्यात दिली जाईल, ज्यामुळे भविष्यासाठी आर्थिक आधार सुनिश्चित होईल.

PF withdrawal | UPI व ऑटो-सेटलमेंटची सुविधा :

नव्या प्रणालीमुळे सदस्यांना त्यांच्या पीएफ खात्यातील रक्कम थेट यूपीआय (UPI – Unified Payments Interface) माध्यमातून बँक खात्यात हस्तांतरित करता येईल. सरकारचा उद्देश पीएफ सेवा बँकिंग सेवांइतक्याच सुलभ आणि वापरकर्त्यास अनुकूल बनवण्याचा आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार अधिक जलद आणि पारदर्शक होतील. (PF withdrawal)

याशिवाय ‘ऑटो-सेटलमेंट’ प्रणाली अधिक सक्षम करण्यात आली आहे. 5 लाख रुपयांपर्यंतचे क्लेम आता मानवी हस्तक्षेपाशिवाय डिजिटल पद्धतीने मंजूर केले जातील. अर्ज केल्यानंतर अवघ्या 3 दिवसांत रक्कम थेट खात्यात जमा होईल. आजारपण, मुलांचे शिक्षण, लग्न किंवा घर बांधकाम यांसारख्या तातडीच्या गरजांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या स्वयंचलित प्रक्रियेमुळे कार्यालयांवरील कामाचा ताण कमी होईल आणि दाव्यांच्या निपटाऱ्याची गती वाढेल.

News title : EPFO Launches New PF App

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now