नोकरदारांनो सावध राहा! EPFO ने दिला मोठा इशारा

On: June 17, 2025 11:19 AM
EPFO New Rules
---Advertisement---

EPFO Alert | देशातील 7.7 कोटींपेक्षा अधिक कामगारांसाठी महत्त्वाची सूचना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (EPFO) करण्यात आली आहे. UAN पोर्टल आणि पासबुक पोर्टलवर विनामूल्य उपलब्ध असलेल्या सेवा काही एजंटांकडून शुल्क घेऊन दिल्या जात असल्याचे निदर्शनास आल्याने, ईपीएफओने सर्व सदस्यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. (EPFO Alert)

ईपीएफओने आपल्या प्रणालीमध्ये विविध सुधारणा करून सेवा अधिक पारदर्शक, जलद आणि अनुकूल बनवल्या आहेत. मात्र, याच पार्श्वभूमीवर अनेक सायबर कॅफे चालक, फिनटेक कंपन्या किंवा इतर तिऱ्हाईत एजंट मोफत सेवा देण्यासाठी सदस्यांकडून पैसे उकळत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे ईपीएफओने याबाबत तात्काळ इशारा दिला आहे.

तक्रार निवारणासाठी स्वतंत्र व्यवस्था, एजंट टाळा :

ईपीएफओच्या EPFiGMS किंवा CPGRAMS या अधिकृत तक्रार निवारण पोर्टलद्वारे सदस्य घरबसल्या कोणतीही तक्रार नोंदवू शकतात. या तक्रारी वेळेत निवारणासाठी देखरेख केल्या जातात. केवळ अधिकृत पोर्टलचा वापर करूनच सेवा घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

तिऱ्हाईत कंपन्यांना किंवा सायबर कॅफे (Cyber Fraud) चालकांना भेट देताना आर्थिक आणि वैयक्तिक माहिती लीक होण्याचा धोका असल्याने, सदस्यांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. अशा संस्थांकडून अनावश्यक शुल्क आकारले जाते आणि सदस्यांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते, हे देखील ईपीएफओने स्पष्ट केले आहे.

EPFO Alert | सर्व सेवा पूर्णतः मोफत :

क्लेम फाइल करणे, पीएफ हस्तांतरण, केवायसी अपडेट करणे, पासबुक डाऊनलोड करणे, तक्रार नोंदवणे – या सर्व सेवा ईपीएफओकडून पूर्णतः मोफत दिल्या जातात. या सेवांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे कोणताही अतिरिक्त पैसा देऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. (EPFO Alert)

सदस्य, नियोक्ते आणि पेन्शनधारक यांनी www.epfindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा उमंग अ‍ॅपद्वारे EPFO सेवांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी प्रादेशिक मदत कक्ष किंवा जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.

News Title: EPFO Alert: 7.7 Crore Members Warned Against Paying for Free Services, Caution Against Agents and Third-Party Firms

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now