Hasin Jahan च्या आयुष्यात तिसऱ्या प्रेमाची एन्ट्री; स्वतः दिली कबुली

On: November 27, 2023 4:57 PM
---Advertisement---

मुंबई | भारतीय क्रिकेटपटू (Indian Cricketer) मोहम्मद शमी (Mohammad Shami) याची एकदिवसीय विश्वचषकात चांगला खेळाडू म्हणून चर्चा झाली होती. त्याने केलेल्या उत्तम कामगिरीमुळे चाहत्यांनी त्याला डोक्यावर घेतलं होतं. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी शमी त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेचा विषय ठरला होता.

Entry of third love in Hasin Jahan’s life; Self confessed

शमी त्याच्या घरगुती वादामुळे चर्चेत आला होता. शमीची पत्नी हसीन जहाँने (Hasin Jahan) दाखल केलेल्या घरगुती हिंसाचार प्रकरणी कोलकात्याच्या (Kolkata) अलीपूर न्यायालयाने शमीचा जामीन मंजूर केला होता. दरम्यान, शमीची पत्नी हसीन जहाँ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हसीनने एक व्हिडीओ (Viral Video) तिच्या अधिकृत अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल (Hasin Troll) केलं आहे.

हसीनने कोणता व्हिडीओ शेअर केला?

हसीन जहाँने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर (Instagram Account) शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काही रील्स (Instagram Reels) बनवले आहेत. ज्यामध्ये बाॅलिवूड (Bollywood Movies) चित्रपटातील गाण्याचा समावेश आहे. तलाश या चित्रपटातील ‘दिल ले गया परदेसी कोई रोकना था…’ या गाण्यावर तिने रील बनवली आहे. या गाण्यात बाॅलिवूडची बेबो करीना कपूर खानने (Actress Kareena Kapoor Khan) काम केलं आहे. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Haseen Jahan (@hasinjahanofficial)

व्हिडीओवर नेटकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली?

हसीनच्या व्हिडीओवर नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. तर, एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘ज्या फोनमधून रील्स बनवत आहे, तो फोन देखील शमी याने गिफ्ट दिला आहे..’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘शमीची माफी माग, तो माफ करेल… त्याचं मन फार मोठं आहे..’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मोहम्मद शमी आणि पत्नी हसीन जहाँ यांची चर्चा रंगली आहे.

शमी वर्ल्ड कपमध्ये (World Cup) ज्या प्रकारे खेळला होता. त्यावेळेस शमीच्या पत्नीला त्याच्या कामगिरीबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा तिने दिलेल्या उत्तरांनी अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. ती म्हणाली होती की, “मी कधी क्रिकेट (Cricket) बघत नाही त्यामुळे तसेच मी क्रिकेटची फॅन नाही. मला क्रिकेट आवडत नाही. त्याने किती विकेट घेतल्या त्यातलं मला काही कळत नाही.”

थोडक्यात बातम्या-

Maharashtra Rain Update | सावधान! राज्याच्या ‘या’ भागात गारपीटासह मुसळधार पावसाचा इशारा

शिवसेनेच्या गोटातून मोठी बातमी समोर; ‘त्या’ दोन आमदारांची सुटका?

क्षणात होत्याचं नव्हतं झालं; देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात

“आम्हाला लग्न झालेल्या महिला आकर्षित करतात?”, चौघांनी सांगितल्या अत्यंत धक्कादायक गोष्टी

लग्नानंतर करा फक्त ‘या’ गोष्टी, नवरा कायम राहील फक्त तुमचाच दिवाना!

 

 


Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now