दीपिकाच्या आजाराबद्दल पतीचा गौप्यस्फोट, म्हणाला “तिला लिव्हर…”

On: May 16, 2025 1:59 PM
dipika kakar
---Advertisement---

Entertainment News | ‘ससुराल सिमर का’ मालिकेतील अभिनेत्री दीपिका कक्कड (Dipika Kakar) सध्या गंभीर आजाराशी झुंज देत असून, तिच्या पतीने आणि अभिनेता शोएब इब्राहिमने (Shoaib Ibrahim) व्लॉगद्वारे ही माहिती सार्वजनिक केली. दीपिकाच्या लिव्हरमध्ये मोठा ट्युमर असल्याचं निदान झाल्यानं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचं सावट पडलं आहे.

पोटदुखीपासून लिव्हर ट्युमरपर्यंतचा प्रवास-

दीपिकाला (Entertainment News) बराच काळ पोटदुखीचा त्रास होत होता. सुरुवातीला डॉक्टरांनी इन्फेक्शन असल्याचं सांगून औषधं दिली, मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने ती पुन्हा रुग्णालयात गेली. स्कॅन केल्यानंतर दीपिकाच्या लिव्हरच्या डाव्या बाजूला टेनिस बॉलइतका मोठा ट्युमर असल्याचं स्पष्ट झालं. शोएबने सांगितलं की, हे निदान त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत धक्कादायक ठरलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shoaib Ibrahim (@shoaib2087)

‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ (Entertainment News)  या शोमध्ये सहभागी झालेल्या दीपिकाने प्रकृतीमुळे हा शो अर्धवट सोडावा लागला होता. सध्या ती रुग्णालयात उपचार घेत असून, पुढील तपासण्या सुरू आहेत. सुदैवाने, अद्याप कॅन्सर असल्याचे कोणतेही निदान झालेले नाही, अशी माहिती शोएबने दिली.

सर्जरीपूर्वीच्या टप्प्यावर, संपूर्ण कुटुंब चिंतेत-

दीपिका गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात दाखल असून, तिच्यावर लवकरच सर्जरी होणार आहे. रिपोर्टनुसार ट्युमर कॅन्सरस नाही, मात्र अंतिम निष्कर्ष येईपर्यंत काहीही निश्चित सांगता येत नाही. दीपिका आणि शोएब यांचा दीड वर्षाचा मुलगा रुहान सध्या ब्रेस्ट फीडिंगवर असल्याने त्याची देखील विशेष काळजी घ्यावी लागते आहे.

शोएबने व्लॉगमधून भावनिक अपील करत सांगितलं की, “ही वेळ आमच्यासाठी खूप कठीण आहे. दीपिकासाठी सर्वांनी प्रार्थना करा.” चाहत्यांनी दीपिकाच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा आणि प्रार्थना सुरू केल्या आहेत.

News Title – entertainment news actress Diagnosed with Liver Tumor

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now