Entertainment News | मेहंदी कार्यक्रमाच्या दरम्यान अभिनेता राकेश याला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. जवळच्या रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. रविवारी रात्री उशिरा ही दुर्दैवी घटना घडली. राकेशने काही वेळापूर्वीच लग्नापूर्वीच्या समारंभातील फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता.
‘कांतारा चॅप्टर 1’ चे चित्रीकरण नुकतेच पूर्ण-
मिळालेल्या माहितीनुसार, राकेशने नुकतेच ‘कांतारा चॅप्टर 1’ (Kantara Chapter 1) या चित्रपटाचे (Entertainment News) शूटिंग पूर्ण केले होते. हा चित्रपट ‘कांतारा’चा प्रीक्वेल असून यामध्ये ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) प्रमुख भूमिका साकारत आहे आणि त्यांनीच या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे. या चित्रपटाच्या प्रतीक्षा असलेल्या चाहत्यांना राकेशच्या अचानक निधनामुळे मोठा धक्का बसला आहे.
View this post on Instagram
राकेशच्या निधनाची बातमी येण्याआधी काही तासांपूर्वी त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर लग्नाच्या कार्यक्रमातील काही फोटो शेअर केले होते. या फोटोवरून त्याचं वातावरणातले आनंदाचे क्षण स्पष्ट दिसत होते. मात्र काही तासांतच घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.
‘कॉमेडी खिलाडी’ मधून मिळाली ओळख-
राकेश पूजारी याला खरी ओळख ‘कॉमेडी खिलाडी’ या कन्नड विनोदी कार्यक्रमातून मिळाली होती. त्याच्या अनोख्या शैलीने त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप सोडली होती. त्याच्या विनोदांनी अनेकांच्या (Entertainment News) चेहऱ्यावर हास्य फुलवलं होतं.
अभिनेता (Entertainment News) शिवराज केआर पीटने (Shivraj KR Pete) राकेशच्या निधनाची माहिती दिली आणि सोशल मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. “ज्याने असंख्य चेहऱ्यावर हास्य फुलवलं, त्या आत्म्यास शांती लाभो,” अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. राकेशच्या पश्चात त्याची आई आणि लहान बहीण असा परिवार असून त्यांच्या आयुष्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ज्युनिअर आर्टिस्टचा नदीत बुडून मृत्यू-
काही दिवसांपूर्वीच एक दुसरी दुर्दैवी घटना घडली होती. ‘कांतारा चॅप्टर 1’ च्या ब्रेकदरम्यान नदीत पोहत असताना एका ज्युनिअर आर्टिस्टचा मृत्यू झाला होता. ही घटना चित्रपटाच्या सेटवर घडलेली नव्हती, अशी स्पष्टता निर्मात्यांनी दिली आहे.
या घटनेनंतर चित्रपटाच्या टीमने त्या कलाकाराच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करत सहवेदना व्यक्त केल्या होत्या. सतत दोन दुख:द घटना घडल्याने ‘कांतारा’च्या टीममध्ये शोककळा पसरली असून चाहत्यांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे.






