एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांना मोठा दणका!

On: December 22, 2022 10:43 AM
---Advertisement---

मुंबई | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आल्याचं जाहीर केलं. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये भाऊ चौधरी आणि त्यांचे निकटवर्तीय सुनील पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

संजय राऊतांसाठी हा मो ठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. कारण संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळ्यात तुरुंगात असतांना त्यांना जामीन मिळवण्यासाठी संजय राऊत यांचे बंधु सुनील राऊत आणि भाऊसाहेब चौधरी यांनी सह्या केल्या आहेत. भाऊसाहेब चौधरी हे संजय राऊत यांचे जामीनदार असल्याचं कळतंय.

संजय राऊत यांनी बुधवारी सायंकाळी नाशिकचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती ट्विट करून दिली आहे.

संजय राऊत यांना जामीनदार असलेल्या चौधरी यांच्याच पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे ट्विट राऊत यांना करण्याची वेळ आली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now