महायुतीत मनसेची एंट्री?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ वक्तव्याने राजकारणात खळबळ

On: March 18, 2024 7:48 PM
---Advertisement---

Eknath Shinde | राजकारणातून सर्वात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मनसे आणि भाजप या पक्षांमध्ये युती होणार असल्याचं समोर येत आहे. मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे दिल्लीला रवाना झाल्याची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील भाजपचे दिग्गज नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील सध्या दिल्लीत आहेत.

राज ठाकरे सुद्धा दिल्लीला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. आज (18 मार्च) दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या वेळी बोलत असतना मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

आज (18 मार्च) रोजी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले होते की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आमची विचारधारा सारखीच आहे. यामुळे मनसे देखील महायुतीत सहभागी होणार असल्याच्या शक्यता बळावल्या आहेत.

महायुतीच्या जागावाटपात मनसेची एन्ट्री

सातत्याने राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी होत आहेत. त्यामुळे राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. अशात राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यामुळे

राज ठाकरे यांच्या पक्षासाठी महायुतीकडून दक्षिण मुंबईची जागा दिली जाण्याची शक्यता आहे. या ठिकाणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांना मनसेकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

News Title : eknath shinde on raj Thackeray

महत्त्वाच्या बातम्या-

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर!

मैदानातच स्मृती मंधानाला आला विराट कोहलीचा व्हिडीओ कॉल!

“जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपला कुत्र विचारत नव्हतं…”, नाथाभाऊ कडाडले

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली महत्त्वाची घोषणा

“मर्दा सारखं… ”, भाजपची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now