एकनाथ खडसेंच्या मुलीवर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

On: August 26, 2025 11:13 AM
Pranjal Khewalkar
---Advertisement---

Rohini Khadse | ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर (Pranjal khewalkar) याला अलीकडेच पुण्यातील खराडी भागात रेव्ह पार्टीदरम्यान पोलिसांनी रंगेहात पकडलं. या घटनेनंतर सातत्याने गंभीर आरोप होत आहेत. खेवलकरला अटक झाल्यानंतर त्याच्या मोबाईलमधून धक्कादायक फोटो आणि व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनलं.

या सर्व घडामोडीनंतर रोहिणी खडसे (Rohini Khadse) पतीला वाचवण्यासाठी सरसावल्या होत्या. त्यांनी थेट कोर्टात धाव घेतली आणि पतीला चुकीच्या प्रकरणात अडकवलं जात असल्याचं सांगितलं. मात्र, प्रांजल खेवलकरला दिलासा मिळत नसतानाच आता रोहिणी खडसेंच्याही अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

पुराव्यांची छेडछाड केल्याचा आरोप :

पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. रोहिणी खडसेंवर पतीला वाचवण्यासाठी पुरावे छेडछाड केल्याचा आरोप झाला आहे. फक्त आरोपच नाही, तर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे खडसे कुटुंबासाठी ही परिस्थिती अधिक बिकट बनत चालली आहे.

मागील काही दिवसांपासून रोहिणी खडसे सतत पोलिस आणि वरिष्ठ नेत्यांची भेट घेताना दिसत आहेत. त्यांनी पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. इतकंच नाही तर कोठडीत जाऊन पतीसोबत संवादही साधला होता.

Rohini Khadse | राजकीय पातळीवर हालचाली आणि नवीन प्रश्न :

रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी याच प्रकरणावर शरद पवार यांची देखील भेट घेतली होती. त्यांनी रेव्ह पार्टी प्रकरणातील संपूर्ण माहिती त्यांना दिली आणि पतीला कशा पद्धतीने फसवलं जात आहे हे सांगितलं. मात्र, या प्रयत्नांनंतरही प्रकरण शांत झालेलं नाही.

दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali chakankar) यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट गंभीर आरोप प्रांजल खेवलकर यांच्यावर केले. त्यासोबतच अनेक प्रश्न उपस्थित केले. या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसेंविरोधात कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्या म्हणाल्या होत्या, “योग्य वेळी मी सर्वांना उत्तर देणार आहे.” परंतु सध्या परिस्थिती त्यांच्यासाठी अधिकच कठीण होत असल्याचं दिसत आहे.

News Title: Eknath Khadse’s Daughter Rohini Khadse in Trouble: Accused of Tampering Evidence in Pune Rave Party Case

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now