Heart Blockage Symptoms | आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत हृदयरोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. विशेषतः हार्ट ब्लॉकेज (Heart Blockage Symptoms) ही अशी स्थिती आहे जी सुरुवातीला कोणतीही ठळक लक्षणे न देता शरीरात विकसित होत राहते आणि नंतर हृदयविकाराच्या झटक्यासारख्या गंभीर संकटात रूपांतर करते. त्यामुळे हार्ट ब्लॉकेजची सुरुवातीची लक्षणे ओळखून वेळीच उपचार घेणे अत्यंत आवश्यक ठरते.
हार्ट ब्लॉकेज म्हणजे काय? :
हृदयाच्या नसा म्हणजेच कोरोनरी आर्टरीमध्ये कोलेस्ट्रॉल, चरबी आणि इतर घटक साठू लागतात. ही स्थिती “एथेरोस्क्लेरोसिस” म्हणून ओळखली जाते. ब्लॉकेज वाढल्याने रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि हृदयाला ऑक्सिजन मिळत नाही. ही स्थिती पुढे जाऊन हार्ट अटॅक किंवा कार्डियाक अरेस्टसारखा प्राणघातक धोका निर्माण करू शकते.
हार्ट ब्लॉकेजची प्रमुख कारणं म्हणजे चुकीची जीवनशैली, अति तूप-तेलयुक्त आहार, व्यायामाचा अभाव, सततचा ताणतणाव, धूम्रपान, मद्यपान, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल वाढलेले असणे. याशिवाय, जर कुटुंबात हृदयरोगाचे इतिहास असेल तर अनुवंशिकतेमुळेही ब्लॉकेज होण्याचा धोका वाढतो. वय वाढल्यावर नसे लवचिक राहात नाहीत आणि त्यामुळेही समस्या गंभीर होऊ शकते. (Heart Blockage Symptoms)
अशा सवयींमुळे हळूहळू नसे बंद होऊ लागतात. काही वेळा शरीर याचा इशारा देत असते, परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. हीच दुर्लक्ष वृत्ती पुढे जाऊन जीवावर बेतू शकते.
Heart Blockage Symptoms | हार्ट ब्लॉकेजची सुरुवातीची लक्षणं कोणती? :
डॉ. अजीत जैन यांच्या मते, हार्ट ब्लॉकेजची सुरुवात ही लक्षणांपासून सहज ओळखता येते. हलका थकवा, चालताना श्वास लागणे, छातीत किरकोळ जळजळ किंवा दुखणे. पुढे जाऊन हे दुखणे डाव्या हातात, जबड्यात किंवा पाठीमागेही जाणवू शकते.
याशिवाय, थकवा, घाम येणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणेही दिसू शकतात. काहींना रात्री झोपताना छातीत दडपण जाणवते. ही सर्व लक्षणे लक्षणीय असून, ती वारंवार दिसत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.
हार्ट ब्लॉकेज टाळण्यासाठी काय करावं? :
संतुलित आहार – कमी तेल, मीठ व साखरेचा वापर, फळं, भाज्यांचा समावेश
नियमित व्यायाम – दररोज किमान ३० मिनिटं चालणं, सायकलिंग, योग
धूम्रपान-मद्यपान टाळा – हृदयावर वाईट परिणाम करणाऱ्या सवयी टाळा
आरोग्य तपासणी – कोलेस्ट्रॉल, बीपी, ब्लड शुगर वेळेवर तपासा
तणाव नियंत्रण – मेडिटेशन, प्राणायाम यांचा वापर
झोप पूर्ण घ्या – दररोज किमान ७–८ तास झोप घेणं गरजेचं
जर वरीलपैकी कोणतीही लक्षणं तुमच्यात किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींमध्ये दिसत असतील, तर ताबडतोब कार्डियोलॉजिस्टचा सल्ला घ्या. ECG, 2D Echo, Stress Test किंवा Angiography सारख्या तपासण्या करून अचूक निदान करता येऊ शकतं. (Heart Blockage Symptoms)






