Realme 16 5G चा टीझर रिलीज; सेल्फी प्रेमींसाठी ‘हे’ खास फीचर ठरणार गेमचेंजर

On: March 24, 2026 6:35 PM
Realme 16 5G
---Advertisement---

Realme 16 5G India Launch | नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme लवकरच भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन Realme 16 5G लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने या फोनचा अधिकृत टीझर रिलीज केला असून त्यामधून फोनच्या डिझाइन आणि काही खास फीचर्सची झलक पाहायला मिळाली आहे.

भारतातील स्मार्टफोन बाजारात सध्या तीव्र स्पर्धा सुरू असताना कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान सादर करत आहेत. अशा परिस्थितीत Realme ने आपल्या नवीन स्मार्टफोनची घोषणा करत पुन्हा एकदा चर्चेला उधाण आणले आहे.

लवकरच भारतात होणार लॉन्च :

Realme 16 5G हा स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च होणार असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीने अद्याप अधिकृत लॉन्च तारीख जाहीर केलेली नसली तरी हा फोन Flipkart आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लॉन्च होताच ग्राहकांना या दोन्ही प्लॅटफॉर्मवरून तो खरेदी करता येणार आहे.

टीझरनुसार या स्मार्टफोनमध्ये खास “Selfie Mirror Phone” डिझाइन दिले जाणार आहे. फोनच्या मागील कॅमेरा मॉड्यूलमध्ये छोटा मिरर देण्यात आला आहे, ज्यामुळे वापरकर्ते रिअर कॅमेराने फोटो घेताना स्वतःचा चेहरा पाहू शकतात. हे फीचर विशेषतः सेल्फी प्रेमी आणि कंटेंट क्रिएटर्ससाठी उपयुक्त ठरणार आहे. (Realme 16 5G India Launch)

फोनचा लूक स्लिम आणि हलका ठेवण्यात आला असून त्याचा बॅक पॅनल प्रीमियम फिनिशसह येतो. डिझाइनमध्ये iPhone Air सारखा प्रीमियम लूक दिसतो, तर कॅमेरा मॉड्यूल Google Pixel सिरीजप्रमाणे हॉरिझॉन्टल बार डिझाइनमध्ये दिसतो. टीझरमध्ये हा फोन पांढऱ्या रंगात दाखवण्यात आला असून ग्लास फिनिशमुळे तो अधिक आकर्षक वाटतो.

Realme 16 5G India Launch | डिस्प्ले, कॅमेरा आणि परफॉर्मन्स :

जागतिक बाजारात या फोनचा व्हेरिएंट यापूर्वी व्हिएतनाममध्ये लॉन्च करण्यात आला आहे. त्यामध्ये 6.57 इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. परफॉर्मन्ससाठी MediaTek Dimensity 6400 प्रोसेसर देण्यात आला असून तो दैनंदिन वापर आणि गेमिंगसाठी सक्षम मानला जातो.

कॅमेरा विभागात ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आहे. तसेच फ्रंटमध्येही 50 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यामुळे उच्च दर्जाच्या सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगचा अनुभव मिळू शकतो.

दमदार बॅटरी आणि सुरक्षा :

बॅटरीच्या बाबतीतही हा स्मार्टफोन दमदार ठरू शकतो. यात 7,000mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली असून 60W फास्ट चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंगचा सपोर्ट आहे. याशिवाय IP66, IP68, IP69 आणि IP69K रेटिंगमुळे फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहतो. (Realme New Smartphone 2026)

एकूणच डिझाइन, कॅमेरा आणि बॅटरी या तिन्ही बाबतीत Realme 16 5G हा स्मार्टफोन मध्यम किंमत श्रेणीत एक मजबूत पर्याय ठरू शकतो. योग्य किंमतीत हा फोन लॉन्च झाला, तर भारतीय बाजारात तो ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरण्याची शक्यता आहे.

News Title: Realme 16 5G Launch in India Soon: Teaser Reveals ‘Selfie Mirror Phone’ Design and Big Battery

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now