Dry Day Maharashtra | सध्या देशासह राज्यात लोकसभा निवडणूक सुरू आहे. नुकतंच चौथ्या टप्प्यातील मतदान झालं आहे. अनेकांच्या नजरा या आता पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाकडे लागल्यात. याचपार्श्वभूमीवर आता सरकारने तीन दिवस ड्राय डे (Dry Day Maharashtra) ठेवला आहे. कारण तळीरामांनी मतदानासाठी पुढाकार घ्यावा यासाठी ड्राय डे (Dry Day Maharashtra) ठेवण्यात आला आहे.
‘या’ तीन दिवशी ड्राय डे
प्रशासनाने 18 ते 20 मेपर्यंत ड्राय डेची (Dry Day Maharashtra) घोषणा केली आहे. हा ड्राय डे शनिवारपासून ते सोमवारपर्यंत आहे. म्हणजेच शनिवारी रात्री ‘ड्रायडे’ला सुरूवात होणार आहे. त्यानंतर रविवारी पूर्ण दिवस ड्रायडे आणि सोमवारी रात्रीपर्यंत ड्रायडे (Dry Day Maharashtra) ठेवण्यात आला आहे.
18 मे रोजी संध्याकाळी 5 वाजेपासून दारुची दुकाने आणि बार बंद असतील. 19 मे रोजी रात्री दारुविक्री बंद असेल. 20 मे रोजी संध्याकाळी 5 वाजेनंतर दुकाने उघडतील. 5 जून दिवशीही ड्राय डे करण्यात आला आहे. होळी, दिवाळी, गांधी जयंती, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी दिवशी ड्रायडे असतो.
मुंबई आणि ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात मद्य विक्री
गेल्या वर्षात मुंबई आणि ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात मद्यविक्री आणि बिअर विक्रीचं प्रमाण वाढलं आहे. यामुळे राज्याच्या आर्थिक वृद्धीला हातभार लागल्याचं बोललं जात आहे. 2023 च्या पहिल्या सहा महिन्यात ठाणे परिसरात जवळपास 80 लाख बल्क लिटरहून अधिक बिअरची विक्री झाली. 2023 (एप्रिल ते ऑक्टोबर) दरम्यान 988.32 लाख बिअरची विक्री झाल्याचं समजतंय.
मुंबईसह ठाणे भागात मद्यविक्री वाढल्याने सरकारच्या कमाईत आर्थिक वृद्धी झाली आहे. 138.38 कोटींचा महसूल वाढला. गेल्या सहा महिन्यात दारूचा 1719.16 कोटींचा महसूल निघाला आहे. 2023 मध्ये 1857.54 कोटींपर्यंत सरकारची कमाई पोहोचली आहे.
News Title – Dry Day Maharashtra At Thane And Mumbai Loksabha Election 2024 News Update
महत्त्वाच्या बातम्या
बारावीच्या निकालाबाबत अत्यंत महत्वाची अपडेट समोर!
“राजकारणात भाजपला पोरंच होत नाही, म्हणून नकली संताने…”
होर्डिंग दुर्घटनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ आला समोर!
“ज्या रस्त्यावर लोकांचा मृत्यू झाला तिथे मोदींनी..”, संजय राऊत संतापले
राखी सावंतची प्रकृती अत्यंत खालावली, जीवनमरणाचा संघर्ष?; जवळच्या व्यक्तीकडून अपडेट






