ललित पाटीलच्या कुटुंबाचा अत्यंत गंभीर आरोप

On: October 18, 2023 4:09 PM
---Advertisement---

मुंबई | ड्रग माफिया ललित पाटीलला अखेर (Lalit Patil) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली असून त्याला अंधेरी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ललित पाटीलला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावणी आहे.

ललितला अटक केल्यानंतर त्याच्या आईने धक्कादायक दावा केला. त्या म्हणाल्या, की ललितने असा काय मोठा गुन्हा केलाय? त्याच्या एन्काऊंटरची गरज काय? जे लोक मोठमोठे गुन्हे करतात ते सुटतात आणि फिरतात. ललितने असं काय केलंय की त्याचा एन्काऊंटर करावा. पुढे त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट देखील केला.

काय म्हणाली ललितची आई?

“ललितच्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार असल्याची धमकी पोलिसांनी दिली. याबाबत राजकीय नेत्यांनी पोलिसांकडे मागणी केली असल्याचा आरोप ललित पाटीलच्या कुटुंबाने केला. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

ललित पाटीलच्या अटकेनंतर राजकीय नेत्यांनी यावर वक्तव्य करत या मागे कोणाचा हात आहे. याबद्दल तपास झाला पाहिजे अशी मागणी केली. याशिवाय ललित पाटीलची नार्को टेस्ट करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली.

थोडक्यात बातम्या –

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now