निवडणुकीचं बिगुल वाजलं! पुणे, नाशिक महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर

On: August 23, 2025 9:34 AM
Pune Mayor Reservation
---Advertisement---

Pune Municipal Election | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या असतानाच अखेर निवडणूक आयोगाने दिवाळीनंतर महापालिका निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट केले. यानंतर आता पुण्यासह नाशिक, पिंपरी-चिंचवड आणि कल्याण-डोंबिवली महापालिकांनी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे. या घोषणेमुळे नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रत्येक महापालिकेत किती प्रभाग असतील आणि किती नगरसेवक निवडले जाणार याची माहिती समोर आली आहे.

पुणे महापालिकेसाठी 41 प्रभाग निश्चित करण्यात आले असून एकूण 165 नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यात 40 प्रभाग चार सदस्यीय आणि एक प्रभाग पाच सदस्यीय असा समावेश आहे. 2011 च्या जनगणनेनुसार पुणे शहराची लोकसंख्या 34 लाख 81 हजार इतकी गृहीत धरून ही रचना करण्यात आली आहे. (Pune Municipal Election)

पुणे महापालिकेची नवी प्रभाग रचना :

पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक 38 हा सर्वाधिक म्हणजे पाच सदस्यीय असणार असून उर्वरित 40 प्रभाग चार सदस्यीय आहेत. यामुळे एकूण 165 नगरसेवकांची निवडणूक होणार आहे. आंबेगाव-कात्रज हा लोकसंख्येनुसार सर्वात मोठा प्रभाग (1,14,970 लोकसंख्या) असणार आहे, तर अप्पर सुपर इंदिरानगर हा सर्वात लहान (75,944 लोकसंख्या) प्रभाग असणार आहे.

कळस-धानोरी हा पहिल्या क्रमांकाचा प्रभाग असून महंमदवाडी-उंड्री हा 41 वा म्हणजेच शेवटचा प्रभाग असेल. नागरिकांना या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मांडण्यासाठी 22 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत पुणे मनपा भवन, क्षेत्रीय कार्यालये आणि स्वा.वि.दा. सावरकर भवन येथे लेखी हरकती दाखल करता येतील.

Pune Municipal Election | नाशिक, पिंपरी-चिंचवड आणि कल्याण-डोंबिवलीतील प्रभाग रचना :

नाशिक महापालिकेची प्रभाग रचना यावर्षी बदललेली नाही. एकूण 122 सदस्यांची निवडणूक होणार असून 29 प्रभाग चार सदस्यीय आणि 2 प्रभाग (15 व 19 क्रमांक) तीन सदस्यीय असतील. या रचनेवर हरकती 4 सप्टेंबरपर्यंत दाखल करता येतील.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रारूप रचना 32 प्रभागांची असून प्रत्येकी चार सदस्य असेल. त्यामुळे एकूण 128 जागांसाठी निवडणूक होईल. या प्रारूपावर हरकती 4 सप्टेंबरपर्यंत स्वीकारल्या जाणार असून 5 ते 12 सप्टेंबरदरम्यान सुनावण्या पार पडतील. अंतिम प्रभाग रचना 15 सप्टेंबरपर्यंत नगरविकास विभागाकडे सादर केली जाईल. (Pune Municipal Election)

कल्याण-डोंबिवली महापालिकेत 31 प्रभाग निश्चित झाले असून एकूण 122 जागा असतील. यापैकी 29 प्रभाग चार सदस्यीय, तर 2 प्रभाग तीन सदस्यीय आहेत. या शहरातील नागरिकांना देखील आता निवडणुकीची तयारी करण्याची वेळ आली आहे.

News Title: Draft Ward Structure Announced for Municipal Elections in Pune, Nashik, PCMC, Kalyan-Dombivli

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now