Corona Update| पुन्हा कोरोनाचा धोका; डॉ. तात्याराव लहानेंनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती

On: December 21, 2023 1:14 PM
Corona
---Advertisement---

Corona Update | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने महाराष्ट्रात शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. महाराष्ट्रात सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी 45 वर पोहोचली आहे. यामुळे पुन्हा कोरोनाने (Corona Update) टेंशन वाढवलं असून सरकारी यंत्रणा देखील कामाला लागल्या आहेत.

Corona Update | डॉ. तात्याराव लहाने काय म्हणाले?

कोरोनाचा (Corona Update) नवीन व्हॅरीयंट मिळाल्यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. यावर ज्येष्ठ कोव्हिड तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी प्रतिक्रियी दिली. त्यांनी या संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. नव्या जेएन 1 व्हेरियंटने घाबरून जाण्याचे कारण नाही, पण काळजी घेण्याचं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय.

Corona Update | ‘ही’ आहेत लक्षणे

ताप येणे, नाक गळणे, जुलाब होतात. यापुढे फार काही होत नाही. ‘जेएन1’व्हेरियन्टमुळे फुप्फुसाला संसर्ग होण्याचा धोका नाही. मात्र पुढे तो काय स्वरूप प्राप्त करतो ते पाहावं लागेल. ज्या व्यक्तीची प्रतिकार क्षमता कमी असेल त्यांना काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच घश्याचा त्रास असेल तर काळजी घ्यावी, असं त्यांनी सांगितलं.

डॉ. अविनाश भोंडवे यांनीही नव्या जेएन 1 व्हेरियंटसंदर्भात माहिती दिली. कोरोनाचे नवीन, नवीन व्हेरियंट येतच राहणार आहेत. आता आलेला JN1नवा व्हेरियंट अमेरिकेत सप्टेंबरपासून आला. हा नवा व्हेरियंट ओमीक्रोन व्हेरियंटचाच एक भाग आहे. त्याला ओमीक्रोनचा सब व्हेरियंट म्हणता येईल. JN 1 व्हेरियंट देखील अतिशय वेगाने पसरतो. त्याचा मृत्यूदर जास्त नाही, परंतु तो वेगाने पसरत आहे, असं त्यांनी सांगितलं. ज्यांना पूर्वी होऊन गेला आहे त्यांना देखील लागण होते किंवा लस घेतली असेल तरी देखील या नव्या व्हेरियंटची लागण होते, अशी माहिती डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिलीये.

दरम्यान, नव्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव पाहता राज्यातील 17 डिसेंबरला विविध रुग्णालयांमध्ये तयारीच्या दृष्टीने मॉकड्रिल पार पडलं आहे. कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक दक्षता घेण्याची गरज आहे, असं शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

सर्व नागरिकांनी आवश्यकतेनुसार गरजेच्या ठिकाणी मास्क घालणे, वारंवार हात धुणे आणि कोविड नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. या नवीन व्हेरीयंटच्या पाश्र्वभूमीवर सर्व जिल्हयांना दक्षता घेण्याचे कळविण्यात आलं आहे. रुग्णांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

Weather Update | महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा गारठला, आणखी थंडी वाढण्याचा हवामान खात्याचा इशारा

Corona Virus Update | पुन्हा धोका वाढला, महाराष्ट्रानं सुरु केली ‘ही’ महत्त्वाची तयारी!

Milk Farmers | दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर!

Pune News | पुण्यात धक्कादायक प्रकार, भाजप नेत्यानं रेल्वेखाली उडी मारुन आयुष्य संपवलं

Weather Alert | ‘या’ जिल्ह्यांमध्ये थंडी वाढणार, हवामान विभागाचा इशारा

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now