डॉ. शिरीष वळसंगकर मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट! जाणून घ्या नेमकं काय घडलं?

On: August 19, 2025 11:15 AM
Dr. Shirish Valsangkar Death Case
---Advertisement---

Dr. Shirish Valsangkar Death Case | सोलापूरातील गाजलेल्या डॉ. शिरीष वळसंगकर मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात आरोपी ठरलेली मनीषा महेश मुसळे-माने हिने न्यायालयात दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला आहे. या अर्जात तिच्या वकिलांनी मांडलेले मुद्दे आता चर्चेचा विषय ठरत आहेत.

प्रकरणाची पार्श्वभूमी :

18 एप्रिल रोजी नामांकित नेत्रतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar Death Case) यांनी स्वतःच्या बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी मनीषा मानेने डॉ. शिरीष, डॉ. उमा वळसंगकर आणि इतर दोघांना ई-मेलद्वारे गंभीर आरोप करणारे संदेश पाठवले होते. यामुळे डॉ. शिरीष व्यथित झाले आणि अखेरीस त्यांनी जीवन संपवले, अशी फिर्याद डॉ. अश्विन वळसंगकर यांनी सदर बाजार पोलिसात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी मनीषाला अटक करून तिच्यावर गुन्हा दाखल केला. (Dr. Shirish Valsangkar Death Case)

मनीषाने पाठवलेल्या ई-मेलमध्ये डॉक्टरांवर आक्षेपार्ह आरोप केले होते. त्यानंतर तिने लिखित माफीनामा दिला होता, मात्र त्यातही ती आपल्या आरोपांवर ठाम असल्याचे स्पष्ट केले होते. या घटनाक्रमानंतर डॉक्टरांच्या आत्महत्येस मनीषाच जबाबदार असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले.

Dr. Shirish Valsangkar Death Case | मनीषाचा युक्तिवाद :

ॲड. प्रशांत नवगिरे यांच्या माध्यमातून सादर केलेल्या अर्जात म्हटलं आहे की, ई-मेलमध्ये पगार व अधिकार कमी झाल्याबद्दल तक्रार करण्यात आली होती, मात्र त्यातून आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा थेट हेतू दिसत नाही. तसेच सबंध दोषारोपपत्र आणि कागदपत्रांचा अभ्यास केल्यास मनीषाने आत्महत्येस प्रवृत्त केले असे ठोस पुरावे नाहीत त्यामुळे डॉक्टरांच्या आत्महत्येचा आणि मनीषाच्या कृतीचा थेट संबंध आढळत नाही. (Dr. Shirish Valsangkar Death Case)

मनीषाने या मुद्द्यांवर न्यायालयात दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर सरकार पक्षाचे मत मांडण्यासाठी 26 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.

News Title: Dr. Shirish Valsangkar Death Case: Big Twist as Accused Manisha Mane Files Acquittal Plea in Court

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now