भाजपच्या बड्या नेत्याचा भयानक अपघात; प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर

On: April 17, 2024 1:44 PM
Dr. Fuke Car Accident
---Advertisement---

Dr. Fuke Car Accident l सर्वत्र लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरु आहे. सर्वच पक्षातील नेते मंडळींसह कार्यकर्ते देखील प्रचारात मग्न आहेत. अशातच विदर्भातील मतदान अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपल आहे. हे मतदान 19 एप्रिलला पाच जागांसाठी होणार आहे. त्यामुळे प्रचार दिवस रात्र सुरु आहे.

गाडी चालकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला :

या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी मंत्री आणि भंडारा- गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या गाडीचा भीषण अपघात होणार होता. ही धक्कादायक घटना आज (दि. १७ एप्रिल) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.

मात्र गाडी चालकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. या अपघातातून डॉ. परिणय फुके बचावले आहेत. मात्र आता या घटनेनंतर हा घातपात असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Dr. Fuke Car Accident l नेमका प्रकार कसा घडला? :

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, डॉ. परिणय फुके हे मंगळवारी (16 एप्रिल) ला रात्री भंडारा लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे करडगाव येथे गेले होते. त्यानंतर सभा आटोपून रात्री उशिरा ते लाखनी येथे परत येत होते. मात्र यावेळी रात्री 2 वाजताच्या सुमारास साकोली जवळ एक अज्ञात वाहन डॉ. फुके यांच्या वाहनासमोर आले पण त्यांच्या चालकाने समयसूचकता दाखवली. त्यामुळे हा मोठा अनर्थ टळला आहे.

मात्र या घटनेत डॉ. परिणय फुके यांचे वाहन अपघातातून बचावले आहे. पण त्यांच्यामागे असलेल्या त्यांच्या ताफ्यातील एक वाहन महामार्गावरील दुभाजकावर जोरात आदळले. यामध्ये या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र या घटनेत वाहनातील सुरक्षा रक्षक आणि इतर सहकाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

या घटनेतील संबंधित अज्ञात घटनेनंतर पळून गेले आहेत. यावेळी चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने डॉ. फुके या भीषण अपघातातून बचावले आहेत. मात्र आता हा अपघात आहे की घातपात अशी शंका व्यक्त केली जात आहे. तसेच लोकसभा निवडणुकी दरम्यान हा प्रकार घडल्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागमी डॉ. फुके यांचे कार्यकर्ते करत आहेत.

News Title – Dr. Fuke Car Accident News

महत्त्वाच्या बातम्या –

“मला लग्न करायचं नाही”, लग्नाच्या दिवशीच तरूणाने उचललं मोठं पाऊल

कोल्हापूरचे शाहू छत्रपती यांची संपत्ती किती?, आकडा वाचून थक्क व्हाल

लोकसभेच्या रिंगणात वंचितचा लढा कुणाविरोधात?, प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

ऐश्वर्याने उरकलं दुसरं लग्न, लग्नाचे फोटो आले समोर

गुड न्यूज; गुंतवणूकदारांचे पैसे होणार दुप्पट

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now