‘उगाच मराठ्यांच्या नादाला लागू नका…’; जरांगेंचा ‘या’ बड्या नेत्याला इशारा

On: November 23, 2023 11:42 AM
---Advertisement---

नाशिक | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. उपोषणानंतर जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचं म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही.

दरम्यान, जरांगे पाटील यांची मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यानंतर आज नाशिक येेथे इगतपूर्वीत जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलत असताना जरांगेंनी मंत्री भूजबळांवर नेम धारला शिवाय त्यांच्यावर सडकून टीका केली. या बरोबरच त्यांनी भुजबळांना इशारा देखील दिला आहे.

जरांगेंनी भुजबळांना कोणता इशारा दिला?

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात प्रवेश देण्याचा दिवस जवळ आला आहे. मराठयांच्या सर्व नोंदी सापडल्या असून आता विजयाचा दिवस जवळ आला आहे. तोपर्यंत शांतता राखण्याचे आवाहन करत मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळाल्यानंतर भुजबळांकडे बघू असा इशारा दिला आहे.

पुढे ते म्हणाले की, उगाच मराठयांच्या नादाला लागू नका आम्ही शांत आहोत, असा इशारा देतानाच जनतेचा पैसा खाल्ला म्हणूनच तर तुम्हाला जेलमध्ये बेसन भाकरी खावी लागली, असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर केला.

तू कुठे भाजी विकत होतास, कोणाचे काय करत होतास, मुंबईत काय-काय केले, कोणत्या नाटकात आणि चित्रपटात काम केले याची मला माहिती आहे. तू कोणाचा बंगला बळकावला हे देखील मला माहिती आहे, असं देखील जरांगे म्हणाले.

थोडक्यात बातम्या – 

वर्ल्डकपचा पराभव जिव्हारी लागला, रोहित ‘हा’ मोठा निर्णय घेणार?

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांच्या सभेत राडा

पुणेकरांनो काळजी घ्या! नाहीतर होऊ शकतो ‘हा’ आजार

‘जिंकलोच असतो, पण पनवतीने हरवलं’; राहुल गांधींची मोदींवर टीका 

पुढील 24 तासांत राज्याच्या ‘या’ भागात पावसाचा अंदाज 

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now