DMart Rules | देशभरात स्वस्त दर आणि आकर्षक सवलतींसाठी प्रसिद्ध असलेल्या डीमार्टमध्ये खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. पेमेंट पद्धती, वस्तू परत करण्याचे धोरण, सूट आणि स्टोअरमधील सुरक्षा नियम याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे लागू आहेत. या नियमांची माहिती असल्यास ग्राहकांना खरेदी करताना अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर अनुभव मिळू शकतो.
डीमार्टमधील खरेदीचे महत्त्वाचे नियम :
देशभरात लोकप्रिय असलेल्या डीमार्ट (DMart) रिटेल स्टोअरमध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी काही ठरावीक धोरणे लागू आहेत. ग्राहकांना कमी दरात वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या स्टोअरमध्ये खरेदी करताना सूट, पेमेंट आणि परताव्यासंबंधी नियम समजून घेणे गरजेचे आहे. स्टोअरमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला या नियमांचे पालन करावे लागते आणि कर्मचारी तसेच व्यवस्थापन यांची अंमलबजावणी करतात. (DMart shopping tips)
डीमार्टमध्ये विक्रीसाठी असलेल्या अनेक वस्तूंवर किमान दोन टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते. खरेदीच्या बिलाची अंतिम रक्कम तयार करताना ती एक रुपयापर्यंत ‘राउंड ऑफ’ करण्याची पद्धत वापरली जाते. ग्राहकांना रोख व्यवहारासोबतच विविध डिजिटल आणि कार्ड पेमेंट पर्यायांचा वापर करण्याची सुविधा दिली जाते, त्यामुळे व्यवहार अधिक सोयीस्कर होतात.
DMart Rules | वस्तू परतावा आणि सुरक्षा नियम :
डीमार्टमध्ये खरेदी केलेल्या वस्तू परत करण्यासाठीही काही ठरावीक नियम लागू आहेत. ग्राहकांना वस्तू खरेदी केल्यानंतर सात कामकाजाच्या दिवसांच्या आत मूळ बिलासह ती परत करण्याची परवानगी असते. परतावा किंवा बदलाची प्रक्रिया संबंधित स्टोअरच्या कामकाजाच्या वेळेत पूर्ण करावी लागते. साधारणपणे डीमार्ट स्टोअर सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत सुरू असते आणि ज्या स्टोअरमधून वस्तू घेतली आहे त्याच ठिकाणी परताव्याची प्रक्रिया करावी लागते. (DMart customer guidelines)
वस्तू परत करताना ती मूळ पॅकिंगमध्ये आणि विक्रीसाठी योग्य स्थितीत असणे आवश्यक आहे. जर खरेदी क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे केली असेल तर परताव्याच्या वेळी सुमारे एक टक्का रक्कम कपात केली जाऊ शकते. काही वस्तूंवर मात्र परतावा लागू नसतो. यामध्ये कॉस्मेटिक्स, शेव्हिंग प्रॉडक्ट्स, अंतर्वस्त्रे, परफ्यूम, डिओडरंट, केसांचे अॅक्सेसरीज, दूध तसेच चिलर किंवा फ्रीजरमधील वस्तू आणि हंगामी उत्पादने यांचा समावेश आहे. (DMart Rules)
याशिवाय उत्पादकांकडून हमी किंवा वॉरंटी असलेल्या वस्तूंसाठी ग्राहकांनी संबंधित कंपनीच्या अधिकृत सेवा केंद्राशी संपर्क साधावा लागतो. स्टोअरमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास परवानगी नसते, तसेच आतमध्ये खाणे-पिणेही बंदी आहे. मोठ्या बॅग्जची तपासणी प्रवेश आणि बाहेर पडताना केली जाऊ शकते. संपूर्ण स्टोअर सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली असते आणि चोरी किंवा गैरवर्तन आढळल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई होऊ शकते.






