Disha Vakani | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (‘Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’) ही मालिका गेल्या १५-१६ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत अनेक कलाकारांनी काम केले, पण दयाबेनची (Dayaben) भूमिका साकारणाऱ्या दिशा वकानीची (Disha Vakani) जागा कोणीही घेऊ शकले नाही.
२०१७-१८ मध्ये तिने मालिका सोडली, आणि चाहते अजूनही तिची आठवण काढतात. नुकताच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात ती गरोदरपणाबद्दल (Pregnancy) आणि मुलीच्या जन्माबद्दल बोलत आहे.
प्रसूतीच्या वेदना आणि गायत्री मंत्र
व्हिडिओमध्ये दिशा वकानी सांगते, “जेव्हा मी पहिल्यांदा आई झाले, तेव्हा मला प्रसूतीच्या वेळी खूप वेदना झाल्या. त्या खूप भयंकर होत्या आणि मी घाबरले होते. पण मी पॅरेंटींगचा (Parenting) कोर्स करत होते, त्यामुळे मला सांगण्यात आले की, तू आई आहेस, तू ओरडू नकोस, नाहीतर बाळ घाबरेल. मग मी गायत्री मंत्र (Gayatri Mantra) बोलू लागले आणि हसत हसत बाळाला जन्म दिला.”
दिशा पुढे म्हणाली, “मी मनात सतत गायत्री मंत्राचा जप करत होते, डोळे मिटून हसत होते आणि अशाप्रकारे मी माझी मुलगी स्तुतीला (Stuti) जन्म दिला. गर्भवती असलेल्या प्रत्येक आईला मी हा अनुभव सांगते की, त्यांनी या मंत्राचा जप करावा, कारण यामुळे खूप शक्ती मिळते.”
चाहत्यांच्या प्रतिक्रिया
दिशा वकानीचा हा व्हिडिओ पाहून एका चाहत्याने लिहिले की, ‘तिच्या पतीने तिचे करिअर उद्ध्वस्त केले.’ दुसऱ्याने लिहिले, ‘खूप जास्त मेक-अप आहे.’ आणखी एका चाहत्याने कमेंट केली, ‘ती आशा पारेखसारखी (Asha Parekh) दिसते.’ तर एका चाहत्याने तिला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत परत येण्याची विनंती केली.
View this post on Instagram
Title : Disha Vakani Recalls Her Delivery Experience Chanted Gayatri Mantra






