‘वडिलांचे विवाहबाह्य संबंध, आर्थिक अडचणी?’, दिशा सालियान प्रकरणी सर्वात मोठा खुलासा समोर!

On: March 28, 2025 2:02 PM
disha salian
---Advertisement---

Disha Salian | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मॅनेजर (Manager) दिशाच्या मृत्यूच्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे. जवळपास पाच वर्षांनंतर तिच्या वडिलांनी न्यायालयात या प्रकरणाच्या नव्या तपासाची मागणी केली असून, यामुळे पुन्हा नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

काय आहे प्रकरण?

दिशा सालियानच्या (Disha Salian) वडिलांनी (Satish Salian) मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत, त्यांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपामध्ये काही मोठ्या राजकीय नेत्यांची नावेही घेतली गेली असून, (Aditya Thackeray) यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या याचिकेमुळे या प्रकरणाने पुन्हा एकदा गती घेतली आहे आणि चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

मात्र या प्रकरणात मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासातून एक वेगळाच निष्कर्ष समोर आला आहे. दिशाच्या (Disha Salian) शवविच्छेदन अहवालात लैंगिक अत्याचाराचे कोणतेही पुरावे आढळले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्या डोक्याला झालेल्या गंभीर जखमा, अनेक हाडांचे फ्रॅक्चर, तसेच डोळे, हात आणि पायावरच्या जखमांमुळे तिचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. ८ जून २०२० रोजी झालेल्या तिच्या मृत्यूनंतर ११ जून २०२० रोजी शवविच्छेदन करण्यात आले होते.

पोलीस तपासात आत्महत्येचा निष्कर्ष

मालवणी पोलिसांनी (Malvani Police) यापूर्वी दिलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशा सालियानने आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आले होते. तपासात असेही उघड झाले की, दिशा आर्थिक अडचणीत होती आणि तिच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध होते. या संबंधांमुळे ती तणावात होती आणि त्या समस्यांवर पैसे खर्च करून ती थकली होती. या गोष्टीबद्दल तिने आपल्या मित्रांना सांगितले होते.

या सर्व तणावामुळे दिशाने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला होता. या निष्कर्षामुळे बलात्कार व हत्या या आरोपांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तथापि, तिच्या वडिलांनी नव्या तपासाची मागणी केल्याने हे प्रकरण पुन्हा ऐरणीवर आले आहे.

News Title : disha salian fathers extra martial affair

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now