‘मी 18 वर्षांची असताना…’, प्रसिद्ध अभिनेत्रीचा करण जोहरबद्दल मोठा खुलासा

On: March 2, 2024 1:51 PM
Disha Patani big revelation about Karan Johar
---Advertisement---

Karan Johar | बॉलिवूडचा दिग्दर्शक करण जोहर याच्यावर इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे करण(Karan Johar ) सतत काही न काही कारणांमुळे चर्चेत असतो. नुकताच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर ‘योद्धा’ सिनेमाचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम पार पडला.

याच कार्यक्रमात करण जोहरसोबत अभिनेत्री राशी खन्ना आणि दिशा पाटनी उपस्थित होती. याचदरम्यान, दिशा पाटनी हीने करणबद्दल एक मोठा खुलासा केला. दिशाने करणचं मोठं सत्य सर्वांसमोर आणलं आहे. त्यामुळे सध्या दिशाच्या या वक्तव्याचीच चर्चा रंगत आहे.

दिशा पाटनीचा मोठा खुलासा

अभिनेत्री दिशा पाटनी आपल्या करीअर आणि मॉडेलिंगच्या दिवसांबद्दल म्हणाली की, “मी फक्त 18 वर्षांची होती. तेव्हा मी माझ्या मॉडेलिंगकडे अधिक लक्ष दिलं. आज मी अभिनेत्री आहे, तर फक्त आणि फक्त करण जोहरमुळे. जर करणने मला संधी दिली नसती तर, मी इंडस्ट्रीमध्ये नसती”, असा मोठा खुलासा यावेळी दिशाने केला.

पुढे ती म्हणाली की, करणबद्दल (Karan Johar ) नेहमी काही न काही आरोप केले जातात. पण, मी बाहेरुन आलेली व्यक्ती आहे, करणने मला संधी दिली. आता दिशाच्या या वक्तव्याची एकच चर्चा रंगली आहे. दिशाचं हे वक्तव्य ऐकून सिद्धार्थ मल्होत्राने करणला मिठी मारली आणि ‘आय लव्ह यू’ म्हणाला.

दिशाच्या या विधानाला सिद्धार्थनेही पाठिंबा दिला आहे. ‘दिशा अगदी बरोबर आणि खरं बोलत आहे’,असं यावेळी सिद्धार्थ म्हणाला. त्यांचा हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र करण जोहर याची चर्चा रंगली आहे.

करण जोहरचं टीकाकारांना प्रत्युत्तर

करण जोहरवर (Karan Johar ) नेहमी नेपोटिजम बद्दल आरोप केले जातात. या आरोपांबद्दल याच मंचावर करणने सर्वांना प्रत्युत्तर दिलं. ‘जी लोकं आरोप करतात की आम्ही फक्त बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत काम करतो, तर शशांक खेतान आउटसाईडर आहेत. ‘योद्धा’ सिनेमाचे दिग्दर्शक सागर आणि पुष्कर देखील आउटसाईडर कालाकारांचं प्रतिनिधित्व करतात. योद्धा सिनेमाचा लिड अभिनेता आउटसाईडर आहे…’, असं म्हणत करणने सर्वांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

दरम्यान, अभिनेत्री दिशा पाटणी ही 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एमएस धोनी : दी अनटोल्ड स्टोरी’ सिनेमात सहाय्यक भूमिकेमध्ये दिसून आली होती. यानंतर ती सलमान खान तसेच अनेक कलाकारांसोबत मोठ्या पडद्यावर दिसून आली आहे.

News Title – Disha Patani big revelation about Karan Johar

महत्त्वाच्या बातम्या-

महाशिवरात्रीचा उपवास करत असाल तर ‘या’ चूका करू नका

‘अशा’ व्यक्तींकडे कितीही कमावले तरी पैसे टिकत नाही!

धक्काबुक्की का झाली?; महेंद्र थोरवेंनी सांगितलं खरं कारण

अल्पवयीन मुलीसोबत घडला भयानक प्रकार, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

Join WhatsApp Group

Join Now