विक्की कौशलने ‘छावा’मध्ये डमी घोडा वापरला?, व्हिडिओ तूफान व्हायरल

On: March 15, 2025 7:50 AM
Dummy Horse in  Chhaava 
---Advertisement---

Chhaava | ‘छावा’ चित्रपट हा विक्की कौशल (Vicky Kaushal), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि अक्षय खन्ना (Akshaye Khanna) यांच्या अभिनयामुळे चांगलाच गाजला. याचबरोबर त्याची भव्यता, सेट्स आणि तांत्रिक बाजू यामुळेही तो चर्चेत आहे. मात्र, आता या चित्रपटाबाबत (Chhaava) नवा वाद निर्माण झाला आहे. विक्की कौशलने प्रत्यक्षात घोडेस्वारी केली की डमी घोड्याचा वापर केला? याबाबत सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

विक्की कौशलच्या मेहनतीवर प्रश्नचिन्ह?

2025 सालातील सर्वात मोठा ओपनर ठरलेल्या ‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा प्रेक्षकांच्या मनाला भावली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि विक्की कौशल यांनी सांगितले होते की, चित्रपटातील प्रत्येक सीन विक्कीने स्वतः केला आहे आणि कोणताही वीएफएक्स वापरण्यात आलेला नाही. तसेच, विक्की कौशलने तलवारबाजी आणि घोडेस्वारीसाठी विशेष प्रशिक्षण घेतल्याचेही सांगण्यात आले होते.

मात्र, आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘छावा’च्या BTS (मेकिंग) व्हिडीओमुळे हा दावा खोटा ठरत असल्याचे काही लोकांचे मत आहे. या व्हिडीओमध्ये विक्की कौशल डमी घोड्यावर बसून शूटिंग करताना दिसत आहे. यामुळे काही नेटकऱ्यांनी त्याला ‘मेल कंगना रणौत’ असे संबोधत टीका केली आहे.

फक्त काही सीन्ससाठी डमी घोडा वापरण्यात आला?

या टीकेनंतर विक्की कौशलच्या एका मुलाखतीकडे लोकांचे लक्ष वेधले गेले आहे. त्यामध्ये विक्कीने स्पष्ट केले होते की, त्याने तब्बल सहा महिने घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेतले. त्याच्या सरावासाठी ‘आझाद’ नावाचा घोडा होता. मोठ्या युद्धाच्या दृश्यांपूर्वी विक्की त्या घोड्याशी संवाद साधायचा आणि त्याला म्हणायचा, “भाई, माझी इज्जत तुझ्या हाती आहे, धाव फक्त, मी तुझ्यासोबत आहे!” (Chhaava)

तज्ज्ञांच्या मते, काही विशिष्ट दृश्यांमध्ये तांत्रिक अडचणींमुळे खरा घोडा वापरणे शक्य नव्हते, त्यामुळे डमी घोड्याचा वापर करण्यात आला. मात्र, चित्रपटातील बहुतांश सीन विक्कीने स्वतःच केले आहेत. त्यामुळे डमी घोड्यावरून होणारी टीका योग्य नाही, असेही काही चाहत्यांचे मत आहे.

Title : Did Vicky Kaushal Use a Dummy Horse in  Chhaava 

 

Join WhatsApp Group

Join Now