Dharmendra | ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र मागे त्यांच्या प्रकृतीमुळे चर्चेत होते. काही दिवसांपुर्वी त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. तेव्हापासून धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल विचारणा केली गेली. आता ते एकदम तंदुरुस्त असून त्यांनी आपल्या सोशल मीडियावर अजून एक पोस्ट केली आहे.
धर्मेंद्र यांनी पत्नी हेमा मालिनी यांच्यासाठी एक खास पोस्ट केली आहे. त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे. दोघांच्या व्हिडीओला चाहते लाईक्स आणि कमेंट करत प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
धर्मेंद्र यांची पोस्ट चर्चेत
अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत एका सिनेमातील सीनचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याला त्यांनी‘मित्रांनो मी शुटिंग करणं विसरून जातो जेव्हा भूमिका उत्तम असते…’ असं कॅप्शन लिहिलं आहे. धर्मेंद्र यांनी व्हिडीओ पोस्ट करताच चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. हा व्हिडिओ आता तूफान व्हायरल होत आहे.
धर्मेंद्र यांच्या पोस्टवर एक चाहता म्हणाला,‘माइंड ब्लॉइंग…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘व्हिडीओ मस्तच आहे…’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘पंजाबी देशी स्टाईल अभिनय… मस्तच सर…’ चौथा नेटकरी म्हणाला, ‘गॉड गिफ्टेड अभिनेता…’ अशा अनेक कमेंट करत चाहत्यांनी धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
pic.twitter.com/73Mi9Yb1UQ Friends, when the role is good i don’t act.
— Dharmendra Deol (@aapkadharam) March 29, 2024
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचा व्हिडिओ व्हायरल
1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्रतीज्ञा’ सिनेमातील एक सीन धर्मेंद्र (Dharmendra) यांनी पोस्ट केलाय.धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यासोबत अजीत खान, अजीत देओल आणि व्ही गोपाल या सिनेमात मुख्य भूमिकेत होते. याचं दिग्दर्शन दुलाल गुहा यांनी केलं होतं.
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे.शोले, सीता और गीता, राजा और रानी आणि बगावत यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं. आज देखील दोघांच्या जोडीला चाहते विसरू शकलेले नाहीत. धर्मेंद्र नेहमी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात असतात.
News Title- Dharmendra Share Memorable Video With Hema Malini
महत्त्वाच्या बातम्या –
राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा; ‘या’ भागांना बसणार फटका
तिसऱ्या लग्नानंतरही शोएब मलिकने ‘या’ अभिनेत्रीसोबत केले धक्कादायक कृत्य
लोकसभा निवडणुकीबाबत रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
घर बांधण्याचं स्वप्न महागणार? सिमेंटच्या किंमती ‘तब्बल’ एवढ्या रुपयांनी वाढणार
आयपीएल हंगामात 21 वर्षीय मयंक यादवची हवा, अवघ्या 2 सामन्यात लावले सर्वांना वेड






