शिंदे गटाचा ठाकरेंना मोठा धक्का; ‘हा’ नेता शिंदे गटात जाणार

On: September 14, 2024 3:11 PM
Uddhav Thackeray
---Advertisement---

Uddhav Thackeray l आगामी काळात राज्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहि. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेतेमंडळींनी आपली उमेदवारी निश्चित करण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. राज्यात महाविकास आघाडी आणी महायुती असे दोन घटक पक्ष निवडणीच्या रिंगणात उतरणार आहेत. यामुळे कित्येक नेत्यांची उमेदवारी मिळण्यावरून निराशा होत आहे. त्यामुळे ते पक्ष बदलण्याचा निर्णय घेत आहेत. अशातच आता धाराशिव जिल्ह्यातील कळंबमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

ठाकरे गटाला मोठा धक्का :

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात उमेदवारीसाठी नेतेमंडळी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारत असल्याचे दिसत आहेत. अशातच आज धाराशिव जिल्ह्यातील कळंबमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे हे शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

कळंबमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांनी धाराशिव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी ठाकरे गटाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे शिवाजी कापसे हे शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा सोबत घेऊन शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. कारण आज धाराशिव जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवाजी कापसे यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

Uddhav Thackeray l शिवाजी कापसे यांचा शिंदे गटात प्रवेश :

शिवसेना फुटीनंतर अनेक आमदार व पदाधिकाऱ्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर लोकसभेत ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे. अशातच आता धाराशिव येथील कळंबचे ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांचा आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे. शिवाजी कापसे हे 2019 च्या विधानसभा निवडणूकांसाठी इच्छूक होते.

मात्र पक्षाने कापसे यांना डावलून कैलास पाटील यांना उमेदवारी दिल्याने शिवाजी कापसेंचा नाराजीचा सूर होता. मात्र आता यंदाही विद्यमान आमदार कैलास पाटील यांनाच तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने शिवाजी कापसे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात प्रवेश केला आहे.

News Title : Dharashiv Shivaji Kapse Will Enter shinde Group

महत्त्वाच्या बातम्या-

पुण्यात गणपती पाहायला जाताय? तर ‘या’ ठिकाणी असणार पार्किंग सोय

केंद्राने शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय; होणार फायदाच फायदा

देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट!

ईद-ए-मिलादची सुट्टी 16 ऐवजी ‘या’ तारखेला मिळणार; सरकारने केला मोठा बदल

सोन्याची भरारी! हजारो रुपयांनी महागलं; काय आहेत आजचे भाव?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now