सोन्याची भरारी! हजारो रुपयांनी महागलं; काय आहेत आजचे भाव?

On: September 14, 2024 11:42 AM
Today Gold Rate
---Advertisement---

Today Gold Rate l सणासुदीच्या काळात नागरिक सोन खरेदी करण्यावर अधिक भर देतात. अशातच सध्या सणासुदीचा काळ सुरु आहे. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून सोन्याच्या व चांदीच्या भावात चढ-उतार सुरू असल्याचे दिसत आहेत. मात्र आता सोने-चांदीच्या भावात काल मोठी वाढ झाली आहे. एकाच दिवसात चांदीच्या भावात तब्बल 4400 रुपयांची वाढ होऊन चांदी 87 हजार रुपये प्रति किलो झाली आहे. याशिवाय चांदी सोबतच सोन्याच्या किमतीत देखील वाढ झाली आहे.

सोन्याच्या किंमतीत प्रचंड वाढ :

कालच्या बाजारभावाप्रमाणे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. कारण सध्या सोन्याच्या भावात एक हजार रुपयांनी वाढ होऊन सोनं 73 हजार 900 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून सोन्याचे भाव हे 72 हजारांपासून कमी-जास्त होत आहेत. अशातच गुरुवारी सोनं 72 हजार 900 रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर एक दिवसणी म्हणजेच शुक्रवारी सोन्याच्या किमतीत थेट एक हजार रुपयांची वाढ होऊन काल सोनं 73 हजार 900 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे.

आगामी काळात बँकांचे व्याजदर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता वर्तवली असल्याने सोने आणि चांदी या धातूंकडे गुंतवणुकीचा कल वाढला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने व चांदीचे भाव या चढ उतारांमुळे वाढत असल्याचे सोने व्यावसायिक यांनी सांगितले आहे.

Today Gold Rate l आगामी काळात दोन्ही धातू आघाडी घेणार :

आगामी काळात सोने व चांदी हे दोन्ही धातू मोठी आघाडी घेण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच गेल्या महिन्यापासून सोन्याचे भाव हे देखील तब्बल 72 हजारांपासून कमी-जास्त होत आहेत. याशिवाय गुरुवारी सोनं हे 72 हजार 900 रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर काल देखील त्यामध्ये एक हजार रुपयांची वाढ होऊन सोनं आता 73 हजार 900 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे.

अशातच आज सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोने हे 73,044 रुपये तोळा आहे. तर 23 कॅरेट सोनं हे 72,752 रुपये तोळा आहे/ याशिवाय आज 22 कॅरेट सोने 66,908 रुपयांवर घसरले आहे. तर 18 कॅरेट सोनं आता 58,783 रुपये तोळा आहे.

News Title : Today Gold Rate

महत्त्वाच्या बातम्या-

आजपासून ‘इतक्या’ दिवस बँका बंद राहणार; तुमच्या शहराचं नाव आहे का तपासा?

विधानसभा निवडणुकीसाठी ‘या’ 18 जागांवर काँग्रेस आग्रही, पाहा यादी!

आज या दोन राशीवर शनीची कृपा राहणार; मिळणार आनंदाची बातमी

कोणते लोक हृदयविकाराचा झटका येऊनही मरत नाहीत? जाणून घ्या यामागील शास्त्र

पुण्यात गोळीबार! माजी नगरसेवकाची पिस्तूल लोड केली अन् पुढं घडलं भयंकर

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now