सोलापूरात मोठा राडा, राधाकृष्ण विखे पाटलांवर उधळला भंडारा

On: September 8, 2023 12:47 PM
---Advertisement---

सोलापूर | मराठा आरक्षणापाठोपाठ (Maratha Reservation) धनगर आरक्षणाचा मुद्दा देखील तापण्याची शक्यता आहे. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याचे महसूलमंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhkrishna Vikhe Patil) पाटील यांच्यावर भंडारा टाकण्याचा प्रकार घडलाय. विखे पाटील यांनी भेट धनगर आंदोलकांची भेट घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेत असताना त्यांच्यावर भंडारा उधळण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

राधाकृष्ण विखे पाटील सोलापूर दौऱ्यावर असून शासकीय विश्रामगृहात ते थांबले होते. यावेळी धनगर आरक्षणाची मागणी करणारं निवेदन घेऊन कृती समितीचा एक सदस्य तिथे आला. त्यानं विखे पाटील यांना निवेदन दिलं. हे निवेदन विखे पाटील वाचत असताना या सदस्यानं त्यांच्या डोक्यावर भंडारा टाकला. यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

विखे पाटील यांच्याजवळ उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला चांगलाच चोप दिला. हा प्रकार सध्या चर्चेत असून सुरक्षारक्षक असताना कार्यकर्त्यांनी का मारहाण केली? असा प्रश्न विचारला जात आहे. यावर आता राधाकृष्ण विखे-पाटील यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ज्या आंदोलकांनी माझ्यावर भंडारा उधळला. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल करू नका. त्यांच्यावर कारवाई करू नका असे आदेश मी दिले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

भंडारा उधळण्याच्या आणि आंदोलकांना मारहाण होण्याच्या एका घटनेमुळे भाजपवर काही परिणाम होणार नाही. मी निवेदन घेतलं नसतं, त्यांच्या भावनेचा आदर केला नसता आणि त्यांनी आंदोलन केलं असतं तर समजू शकलो असतो. पण मी निवेदन स्वीकारलं होतं. म्हणणं ऐकून घेत होतो. कोणत्या समाजाचा कार्यकर्ता म्हणून मारहाण करण्याचा काही हेतू नव्हता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now