एकट्या धनश्री वर्माची संपत्ती किती?, आकडा वाचून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल!

On: March 22, 2025 12:54 PM
dhanashree verma
---Advertisement---

Dhanashree Verma | भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि नृत्यदिग्दर्शिका धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांच्यातील वैवाहिक नातं अधिकृतपणे संपुष्टात आलं असून, 20 मार्च रोजी बांद्रा कौटुंबिक न्यायालयात त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यांच्या वकिलांनी घटस्फोटाच्या बातमीला दुजोरा दिला असून, चहलने 4.75 कोटी रुपये अलिमनी स्वरूपात दिल्याचं चर्चेत आहे.

चहलच्या टीशर्टवरून चर्चांना उधाण

चहल आणि धनश्री यांच्यातील वेगळेपणाच्या बातम्या सोशल मीडियावर आधीच गाजत होत्या. घटस्फोटानंतर चहलने परिधान केलेल्या काळ्या रंगाच्या टीशर्टवर “Be your own sugar daddy” असे लिहिलेलं होतं. ही टीशर्ट पाहून अनेकांनी सूचकपणे धनश्रीने अलिमनीसाठी घटस्फोट घेतल्याचं म्हणत चर्चेला उधाण दिलं. जरी दोघांनी किंवा त्यांच्या वकिलांनी यावर कोणतंही वक्तव्य केलं नसलं, तरी चहलच्या या टीशर्टवर सोशल मीडियावरून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. काही चाहत्यांनी तर ही टीशर्ट ट्रेंडमध्ये आणली.

या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर चहल आणि धनश्री यांच्यात कोण योग्य आणि कोण चूक या मुद्यावर चर्चांचा भडका उडालाय. त्याच दरम्यान, दोघांची एकूण संपत्ती काय आहे, यावरही लक्ष केंद्रीत झालंय.

धनश्री वर्माची कमाई आणि संपत्ती

धनश्री वर्मा मूळची दुबईत जन्मलेली आणि भारतात वाढलेली असून ती एक यशस्वी कोरिओग्राफर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. सुरुवातीला तिने दंतचिकित्सक म्हणून शिक्षण घेतलं होतं, मात्र नृत्यावरील प्रेमामुळे तिने करिअरच्या दिशेने वळण घेतलं. सोशल मीडियावर तिचं मोठं फॅनबेस असून, इंस्टाग्रामवर तिचे 6.3 दशलक्ष फॉलोअर्स आहेत आणि यूट्यूबवर 2.79 दशलक्ष सबस्क्रायबर्स आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dhanashree Verma (@dhanashree9)

तिच्या कमाईचा प्रमुख स्रोत म्हणजे ब्रँड प्रमोशन्स, संगीत व्हिडिओ आणि स्वतःची डान्स कंपनी. या सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नामुळे तिची एकूण संपत्ती सुमारे 24 कोटी रुपयांच्या घरात आहे. आता पाहूया चहलची आर्थिक स्थिती.

युझवेंद्र चहलची एकूण संपत्ती

भारतीय क्रिकेट संघातील प्रमुख फिरकीपटूंपैकी एक असलेला चहल केवळ क्रिकेटच नव्हे तर ब्रँड अ‍ॅडव्हर्टायझमेंट्स आणि गुंतवणुकीतूनही चांगली कमाई करतो. त्याचे BCCI आणि IPL सोबत करार आहेत, जे त्याच्या वार्षिक उत्पन्नात भर घालतात. याशिवाय तो हरियाणा आणि गुरुग्राममध्ये कोट्यवधींच्या मालमत्तेचा मालक आहे.

चहलच्या लक्झरी गाड्यांच्या संग्रहात Porsche Cayenne S आणि Mercedes Benz C-Class यांचा समावेश आहे. विविध स्त्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे चहलची एकूण संपत्ती सुमारे 45 कोटी रुपये असल्याचं समजतं. सध्या चहल रेडिओ जॉकी महवश हिच्याशी डेट करत असल्याच्या बातम्याही चर्चेत आहेत.

News Title : dhanashree verma net worth

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now