Bell Palsy Disease l राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिला असला, तरी त्यांनी यामागे वैद्यकीय कारणांचा दाखला दिला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची डोळ्याची शस्त्रक्रिया (Eye Surgery) झाली होती, त्यानंतर त्यांना प्रकाश, धूळ आणि तीव्र सूर्यप्रकाश टाळण्याचा सल्ला देण्यात आला होता.
बेल्स पाल्सी (Bell’s Palsy) म्हणजे काय? :
मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांना चेहऱ्याच्या पक्षाघाताचा (Bell’s Palsy) त्रास असल्याचे बोलले जात आहे. हा आजार चेहऱ्याच्या स्नायूंना अचानक अशक्त करतो, त्यामुळे चेहऱ्याची एक बाजू झुकते आणि बोलताना अडथळा येतो. त्यामुळेच धनंजय मुंडे दोन मिनिटेही नीट बोलू शकत नसल्याचे सांगितले जात आहे.
– चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये अचानक कमजोरी येते.
– 48 तासांच्या आत लक्षणे गडद होऊ शकतात.
– कानाजवळ वेदना किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
– हा आजार तात्पुरता असतो आणि बहुतेक रुग्ण 2 आठवड्यांपासून 6 महिन्यांत बरे होतात.
Bell Palsy Disease l बेल्स पाल्सीची संभाव्य कारणे:
– 90% प्रकरणांमध्ये नागीणसारख्या व्हायरल इन्फेक्शनमुळे हा आजार होतो.
– कानाच्या आत श्लेष्मा साठल्याने होणारा दाब
– डोक्याला किंवा कानाला झालेली दुखापत
Bell’s Palsy Disease l लक्षणे आणि उपचार:
– चेहऱ्याची एक बाजू वाकडी होणे.
– पाणी पिताना तोंडाच्या एका बाजूने पाणी बाहेर येणे.
– कानाभोवती सौम्य वेदना.
– बोलताना अडथळा येणे.
– भरपूर सूर्यप्रकाश मिळवणे.
– कोमट पाण्याने स्नान करणे आणि गरम पट्ट्या लावणे.
– स्नायूंच्या हालचाली सुधारण्यासाठी फिजिओथेरपी करणे.
– योग्य डोळ्यांची काळजी घेणे, अन्यथा कॉर्नियल अल्सरेशन होऊ शकते.
धनंजय मुंडे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला, तरी संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे त्यांच्यावर मोठा दबाव होता. त्यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराड (Valmik Karad) हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी असल्याने, सरकारवरही कारवाईचा ताण वाढला होता. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजकीय भवितव्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.






