Devendra Fadnavis | दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे धक्कादायक फोटो आणि काही व्हिडिओ काल सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले. यामध्ये सर्व आरोपींचे चेहरे स्पष्टपणे दिसून आले. यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी प्रचंड जोर धरत होती. अखेर आज (4 मार्च) धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. (Devendra Fadnavis )
CID च्या आरोपपत्रात वाल्मिक कराड हा या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी अजून तीव्र झाली. त्यातच हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली. अखेर आज मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला. यावरच फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, “आज राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिला आहे. तो राजीनामा मी स्वीकारला असून पुढील कारवाईसाठी तो राज्यपाल महोदयांकडे पाठवला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे.”
CID च्या आरोपपत्रानंतर राजीनामा
संतोष देशमुख यांच्या हत्येचे काही धक्कादायक फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली. सोशल मीडियावर आणि विरोधकांकडून सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती.
कारण हत्येच्या कटात सामील असलेला वाल्मिक कराड हा त्यांचा निकटवर्तीय आहे. या परिस्थितीत धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाबाबत प्रचंड प्रश्न निर्माण करण्यात आले. अखेर आज त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. (Devendra Fadnavis )
Title : Dhananjay Munde Resigns Devendra Fadnavis Reacts






