एका रात्रीत तुझं पार्सल बीडला पाठवणार, धैर्यशील मोहिते पाटलांचा ‘या’ दिग्गज नेत्यावर हल्लाबोल

On: April 15, 2024 8:58 AM
Dhairyashil Mohite Patil
---Advertisement---

Dhairyashil Mohite Patil l सध्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच अकलूजमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशाच्या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांसह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

धैर्यशील मोहिते पाटील कडाडले :

यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. यावेळी धैर्यशील मोहिते पाटील बोलताना म्हणाले की, एका व्यक्तीला मला उत्तर द्यायचं आहे. आपण त्या व्यक्तीला इथून निवडून दिल आहे. आणि तो व्यक्ती म्हणाला की, 70 -75 वर्षात जेवढा विकास झाला, तो मी अवघ्या पाच वर्षात केला आहे.

त्यावर धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की, दादांच्या सांगण्यावरुन लोकांनी तुला एका रात्रीत आमदार केल आहे. मात्र आता तुझं पार्सल एका रात्रीत माघारी बीडला पाठवणार आहोत. तुम्ही आमच्या कुटुंबावर तीन पिढ्या प्रेम देखील करत आहात. तसेच सहकार महर्षी आणि विजयदादांच्या विचारांना कधीही तडा जाऊ देणार नाही, एवढा शब्द मी देतो. अशा शब्दांत धैर्यशील मोहिते पाटील यांनी राम सातपुते यांच्यावर टीका केली आहे.

Dhairyashil Mohite Patil l स्थानिक आमदार सगळे विरोधात :

तसेच यावेळी धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की, शरद पवार साहेबांना का सोडून गेलो, याचं उत्तर देण्याची गरज नाही. गेल्या 60-65 वर्षांमध्ये पवार साहेबांनी आणि दादांनी दोस्ती आणि ऋणानुबंध कसे जपलेत, हे सर्व जनतेला माहित आहेत. महेबुब भाईंनी दुरावा का निर्माण झाला हे देखील सांगितलं आहे.

धैर्यशील मोहिते पाटील पुढे बोलताना म्हणाले की, मी वर्षाला 1 लाख कोटी आणले आहेत. तसेच तासाला हजार कोटी देखील आणले म्हणतो, मात्र याचे कामे जनतेला दिसले का? याला नेमकं काय काम करायचे हे देखील माहिती नाही. तेथील स्थानिक आमदार देखील सगळे विरोधात आहेत, असे म्हणत धैर्यशील मोहिते पाटील यांनी सर्वच गोष्टींचा पाढा वाचला आहे.

News Title – Dhairyashil Mohite Patil Against Ram Satpute

महत्त्वाच्या बातम्या

Oops… रोहितच्या एका हातात पँट तर एका हातात बॉल; रोहितसोबत घडली विचित्र घटना

आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हे संघ भिडणार

या राशीच्या व्यक्तींना जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल

एकनाथ शिंदे यांचा एक फोन आणि मॅटर सॉल्व, भिवंडीत नेमकं काय घडलं?

“अबकी बार गोळीबार सरकार”, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now