‘फक्त सुई बदली आहे’, देवमाणूस 3 पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस, पहा दमदार प्रोमो!

On: April 22, 2025 3:11 PM
devmanus 3
---Advertisement---

Devmanus 3 | झी मराठीवरील गाजलेली मालिका ‘देवमाणूस’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेच्या पहिल्या दोन भागांनी प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली होती आणि आता तिचा तिसरा सीझन ‘देवमाणूस – मधला अध्याय’ या नावाने लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.

नवीन कथानक –

‘देवमाणूस (Devmanus 3) – मधला अध्याय’ या नवीन सीझनची कथा पहिल्या आणि दुसऱ्या भागाच्या मधल्या घटनांवर आधारित आहे. डॉक्टर आजीतकुमार देवने (Ajitkumar Dev) कातळवाडीतून पळ काढल्यानंतर तो कुठे गेला? त्याने त्या काळात कोणत्या ठिकाणी कुणाची फसवणूक केली? आणि माणसांच्या विश्वासाचा गैरफायदा कसा घेतला? या सर्व गोष्टींचा वेध हा सीझन घेणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Journo Kapil (@journo_kapil)

या नव्या पर्वात पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत किरण गायकवाड (Devmanus 3)  दिसणार असून, त्याच्यासोबत गावरान भाषेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी सरू आज्जी म्हणजेच रुक्मिणी सुतार यांचीही पुनरागमन होणार आहे. यासोबतच गावातील अनेक नवे आणि जुन्या आठवणी जागवणारे पात्रदेखील यात समाविष्ट असतील, अशी माहिती मिळत आहे.

जुनी टीम, नव्या रूपात कथा पुन्हा रंगणार-

‘देवमाणूस’ या मालिकेच्या तिसऱ्या पर्वात लेखनाची धुरा यापूर्वीप्रमाणेच स्वप्नील गांगुर्डे (Swapnil Gangurde) आणि विशाल कदम (Vishal Kadam) यांनी सांभाळली आहे. पटकथा स्वप्नील गांगुर्डे यांनी लिहिली असून संवाद लेखनाची जबाबदारी विशाल कदम यांनी पार पाडली आहे. यासोबतच या सीझनचं दिग्दर्शनही पुन्हा एकदा राजू सावंत यांनीच केलं आहे. त्यांनी याआधीच्या दोन्ही सीझनचेही दिग्दर्शन केलं होतं.

ही संपूर्ण मालिका वज्र प्रोडक्शनच्या श्वेता शिंदे (Shweta Shinde) आणि संजय खांबे (Sanjay Khambe) यांच्या निर्मितीत साकारण्यात आली आहे. सध्या या मालिकेचे प्रोमो झी मराठीवर झळकत असून, त्यावरून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लवकरच ही मालिका झी मराठीवर प्रसारित होणार आहे.

News Title – Devmanus 3 New Season Announced

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now