तुमचे रक्त माझे चित्र काढण्यासाठी सांडण्यापेक्षा… फडणवीसांचा कार्यकर्त्याला मोलाचा सल्ला

On: May 6, 2024 8:26 AM
Devendra Fadnavis
---Advertisement---

Devendra Fadnavis l सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या लोकसभा निवडणुकीत सर्वच राजकीय दिग्गज नेत्यांनी आपली प्राणप्रतिष्ठा पणाला लावली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर दौऱ्यावर असताना त्यांना एका कलाकाराने अनोखी भेटवस्तू दिली आहे.

माझ चित्र रेखाटण्याऐवजी रक्तदान करा; फडणवीसांचा सल्ला

पंढरपूर येथील प्रचारसभेदरम्यान देवेंद्र फडणवीस यांना पियुष शैलजा गिरीश हत्तीगोटे या कलाकाराने एक भेटवस्तू दिली आहे. कलाकार पियुषने देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच्या रक्तानं रेखाटलेलं चित्र भेट म्हणून दिल आहे. देवेंद्र फडणवीसांनी देखील या कलाकाराचं कौतुक केलं आहे. त्यासोबतच एक प्रेमळ सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर त्या भेटवस्तूचा फोटो शेयर केला आहे. त्यावेळी ते म्हणाले की, माझ चित्र रेखाटण्याऐवजी रक्तदान करा असा सल्ला फडणवीसांनी दिला आहे. तसेच मी पियुषचे मन:पूर्वक आभारी आहे. पियुष तू भेट दिलेले चित्र अतिशय उत्तम आहे यामध्ये काही वाद नाही. एक उत्तम कलाकार म्हणून मी त्याचा सन्मानच करतो. पण माझी यानिमित्ताने एक विनंती सर्वांना आहे, तुमचे रक्त माझे चित्र काढण्यासाठी सांडण्यापेक्षा रक्तदान करा, असं देवेंद्र फडणवीस एक्सवर म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis l भेटवस्तूचा फोटो सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल :

रक्तदान केलं तर अनेकांची आयुष्य वाचण्यासाठी ते कामी येईल. आपले रक्त समाजासाठी अर्पित करणे हीच आपली संस्कृती आहे आणि त्याच मार्गाने आपल्याला वाटचाल करायला हवी असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच फडणवीसांवर दाखविलेल्या या प्रेमाबद्दल त्यांनी पियुषचे आभार मानले आहे.

दरम्यान फडणवीसांना मिळालेल्या या भेटवस्तूचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल आहे. देवेंद्र फडणवीसांंचं हे फक्त चित्रच नाहीतर पियुषने स्वतःच्या रक्ताने हे चित्र काढल्यामुळे त्याच देखील सोशल मीडियावर कौतुक केलं जातं आहे. याशिवाय फडणवीसांनीही हुरहुन्नरी कलाकाराच्या कलेचा मान ठेवला त्यासोबतच एक उत्तम सल्लाही दिला आहे.

News Title –  Devendra Phandavis Picture Drawn In Blood In Pandharpur Artist Piyush Hattigote

महत्त्वाच्या बातम्या

शरद पवार यांची तब्येत बिघडली, डॅाक्टरांनी दिला हा महत्त्वाचा सल्ला

पुढील दोन दिवसात ‘या’ दोन राशींना प्रचंड धनलाभ होईल

राहा कपूरची चाचूसोबत फुल्ल धम्माल-मस्ती; क्युट व्हिडीओ तूफान व्हायरल

जवळच्या व्यक्तीकडूनच अनन्या पांडेच्या ‘त्या’ गोष्टीबद्दल खुलासा, बाॅलिवूडमध्ये एकच खळबळ!

सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी पुण्यात मेट्रोचे… मुरलीधर मोहोळ यांची मोठी घोषणा

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now