शरद पवार यांची तब्येत बिघडली, डॅाक्टरांनी दिला हा महत्त्वाचा सल्ला

On: May 6, 2024 7:58 AM
Sharad Pawar
---Advertisement---

Sharad Pawar l राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. शरद पवार गेल्या काही दिवसांपासून निवडणूक प्रचारात फिरत आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या जाहीर सभा घेतल्या.

शरद पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द :

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांत या सभांसाठी हजारो किलोमीटरचा प्रवास केला आहे. त्यांनी प्रत्येक सभेत जाहीर भाषणही केले आहे. आपल्या भाषणात शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच शरद पवार यांचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. यानंतर त्यांनी पहिल्या टप्प्यापासूनच लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कामाला सुरुवात केल्याचे दिसून आले.

काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात निलेश लंके यांच्या प्रचारासाठी आल्यानंतर त्यांनी घसा दुखत असल्याचे सांगितले होते. मात्र, तरीही त्यांनी अनेक ठिकाणी निवडणूक सभा घेतल्या. या सर्व बैठका आणि दौऱ्यांच्या ताणामुळे त्यांची प्रकृती ढासळली आहे. साहेबांना विश्रांतीची गरज असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. त्यामुळे त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

Sharad Pawar l डॅाक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला :

साहेबांच्या तब्बेतीच्या कारणास्तव त्यांचं आजचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दगदगीमुळेच शरद पवारांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सध्या डॉक्टरांनी त्यांना विश्रातींचा सल्ला दिला आहे.

निवडणूक जाहीर झाल्यापासून पायाला भिंगरी लावून राज्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचारात सलग भाषण देत असल्याने पवारांचा घसा खराब झाला आहे. त्यामुळे बारामतीतली सांगता सभा आटोपल्यानंतर शरद पवार हे गोविंद बागेत विश्रांती घेत आहेत. दरम्यान डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर साहेबांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

News Title – sharad pawar today all program cancelled due to health reason 

महत्त्वाच्या बातम्या

पुढील दोन दिवसात ‘या’ दोन राशींना प्रचंड धनलाभ होईल

राहा कपूरची चाचूसोबत फुल्ल धम्माल-मस्ती; क्युट व्हिडीओ तूफान व्हायरल

जवळच्या व्यक्तीकडूनच अनन्या पांडेच्या ‘त्या’ गोष्टीबद्दल खुलासा, बाॅलिवूडमध्ये एकच खळबळ!

सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी पुण्यात मेट्रोचे… मुरलीधर मोहोळ यांची मोठी घोषणा

श्रीरंग बारणेंचं काम केलं नाही, तर राजकीय भवितव्य धोक्यात!; अजितदादांच्या दट्ट्याने सगळी राष्ट्रवादी लागली कामाला

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now