फडणवीसांनी इंदापुरात पाऊल टाकताच चक्रं फिरली; ‘त्या’ भेटीमुळे चर्चांना उधाण

On: April 5, 2024 6:34 PM
Supriya Sule demanded the resignation of Devendra Fadnavis
---Advertisement---

Devendra Fadnavis | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची शुक्रवारी इंदापूरमध्ये (Indapur) सभा होत आहे. या सभेपूर्वी इंदापूरमध्ये उतरल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका व्यक्तीची भेट घेतली. फडणवीसांनी घेतलेल्या एका भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

देवेंद्र फडणवीस इंदापुरात

देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांची भेट घेतली आहे. प्रविण माने हे खासदार सुप्रिया सुळे यांच्या इंदापूर तालुका प्रचार समितीचे प्रमुख आहेत.

प्रवीण माने हे सुप्रिया सुळे गटातील मानले जातात. ते 15 दिवसांपूर्वीपर्यंत इंदापूरमध्ये सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा प्रचार करत फिरत होते. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण माने यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

प्रवीण माने यांना अजितदादा गटाच्या बाजूने वळवण्यासाठी घरी जाऊन त्यांची भेट घेतल्याची शक्यता आहे. असं असल्यास प्रवीण माने जर अजित पवारांसोबत गेले तर इंदापुरात सुप्रिया सुळे यांना फटका बसू शकतो

प्रविण मानेंच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

फडणवीस म्हणाले की “प्रविण माने दादांशी माझे खूप जुने संबंध आहेत. वैयक्तिक संबंध आहेत. ते अनेकवेळा माझ्या घरी येतात. ते बऱ्याच दिवसांपासून माझ्या मागे लागले होते की, इंदापुरात तुम्ही येता पण माझ्याकडे येत नाहीत.

त्यामुळे मी कबूल केलं होती की, मी तुमच्याकडे चहा प्यायला येईल. त्यामुळे मी त्यांच्याकडे चहा प्यायला गेलो होतो. ते आमच्यासोबतच आहेत. आमचे जुने सहकारी आहेत.”

महत्त्वाच्या बातम्या- 

भरसभेत ‘हा’ नेता ढसाढसा रडला, भाषणादरम्यान मोठा खुलासा

कुख्यात गँगस्टर अरूण गवळी तुरूंगातून सुटणार!

दुसऱ्यांचे पक्ष फोडणाऱ्या भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता!

चाणक्यांचे ‘हे’ शब्द कायम लक्षात ठेवा; मानसिक तणावातून मिळेल मुक्ती

चुकून खरेदी केलेल्या खेळाडूनं सामना जिंकवला, प्रिती झिंटानं केलं असं काही की…

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now