Devara Part-1 Teaser Release | Junior NTR चे खतरनाक अ‍ॅक्शन सिन्स; ‘या’ दिवशी रिलीज होणार Devara

On: January 8, 2024 8:54 PM
Devara Part-1 Teaser Release
---Advertisement---

Devara Part-1 | आरआरआर फेम साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर (Junior NTR) त्याच्या आगामी ‘देवरा’ (Devara Part-1) या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे.एनटीआरच्या चाहत्यांकडून त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पहिली जात आहे. चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाच्या पहिल्या पार्टचा टीजर प्रकाशित करत चाहत्यांना मोठे सरप्राइज दिले आहे.

‘देवरा’ (Devara Part-1 ) या चित्रपटात ज्युनियर एनटीआर खतरनाक अ‍ॅक्शन करताना दिसून येणार आहे. टी-सीरीजच्या यूट्यूब चॅनलवर ‘देवरा पार्ट 1’ चा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे. आता चाहत्यांकडून चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.

Devara Part-1 | NTR चे जबरदस्त अ‍ॅक्शन सिन्स

प्रदर्शित झालेल्या पहिल्या टीजरमध्ये व्हिडिओच्या शेवटी एनटीआरचा एक डायलॉग खूपच फेमस होत आहे. “या समुद्राने माशांपेक्षा रक्त आणि खंजीर जास्त पाहिले आहेत, कदाचित म्हणूनच याला लाल समुद्र म्हणतात.”, असे एनटीआर या सीनमध्ये म्हणत आहे. यात एनटीआरच्या जबरदस्त अ‍ॅक्शन सीनमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

एनटीआरचे ‘देवरा’ (Devara Part-1 ) मधील अ‍ॅक्शन सीन पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्कंठा अजूनच वाढली आहे. एनटीआरसोबत बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य लीडमध्ये दिसणार आहे. यासोबतच अभिनेता सैफ आली खानही यात मुख्य भूमिकेत असणार आहे.

‘या’ दिवशी रिलीज होणार Devara Part-1 |

‘देवरा’ (Devara Part-1 ) हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार आहे.त्याचा पहिला भाग या वर्षी 4 एप्रिल रोजी तेलुगू, तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती मिकिलेनी सुधाकर आणि हरी कृष्ण यांनी केली आहे.

टीजर प्रदर्शित झाल्यानंतर एनटीआरने प्रतिक्रिया देत म्हटले कि,”देवरा चित्रपटात काम करण्याचा अनुभव अप्रतिम होता.मला चाहत्यांकडून मिळत असलेले प्रेम आणि पाठिंबा यामुळे मी खूप खूश आहे. मला आशा आहे की तुम्ही सर्वांनी या चित्रपटाच्या पहिल्या टीजरचा आनंद घेतला असेल.”,

News Title- Devara Part 1 Teaser Release

महत्वाच्या बातम्या- 

Raj Thackeray | “थेट, परखड आणि 100 टक्के…”; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं राज ठाकरेंचं कौतुक

‘लक्षद्वीप-मालदीव’ प्रकरणी Amitabh Bachchan यांचं मोठं वक्तव्य!

Rashmika Mandanna ने दिली गुड न्यूज, ‘या’ अभिनेत्यासोबत थाटणार संसार

Neetu Kapoor यांचा सर्वात मोठा खुलासा!

Mla Disqualification | आमदार अपात्रतेबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर!

Join WhatsApp Group

Join Now