मोठी बातमी! ब्रिजभूषण सिंह यांना 24 तासांचा अल्टिमेटम

On: January 20, 2023 11:04 AM
---Advertisement---

नवी दिल्ली | भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. जागतिक चॅम्पियनशिप विजेती विनेश फोगाट हीने ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैगिक छळाचा आरोप केलाय. त्यानंतर केंद्रीय क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

कुस्ती महासंघाचा निषेध करत साक्षी मलिक (Sakshi Malik),विनेश फोगाट (Vinesh Phogat) यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी आंदोलन केलं आहे. आंदोलक कुस्तीपटूसोबत मंत्री अनुराग ठाकूर यांची बैठक झाली. यानंतर ठाकूर यांनी ब्रिजभूषण सिंह यांना 24 तासात राजीनामा देण्यास सांगितलं आहे. राजीनामा न दिल्यास त्यांना पक्षातून काढून टाकण्यात येईल, असा अल्टिमेटम दिला आहे.

मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी कुस्तीपटूंसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यामांशी संवाद साधला. कुस्तीपटूंनी केलेेेले आरोप अतिशय गंभीर स्वरुपाचे आहेत. भारत सरकारने WFI ला नोटीस पाठवून 72 तासात उत्तर मागितलं आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, आज दुपारी 12 वाजता ब्रिजभूषण सिंह पत्रकार परिषद (Press conference) घेतील. या पत्रकार परिषदेत ते आपली भूमिका स्पष्ट करतील. या वेळी ते आपला राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्या घटनेमुळे भारतीय कुस्ती महासंघावर निषेध नोंदवला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp Group

Join Now