‘बेबी I Love You…’ मेसेज करणाऱ्या चैतन्यानंदचं लोकेशन सापडलं! लुकआऊट नोटीस जारी

On: September 26, 2025 3:55 PM
Swami Chaitanyanand Case
---Advertisement---

Swami Chaitanyanand Case | दिल्लीतील एका खाजगी व्यवस्थापन महाविद्यालयातील लैंगिक शोषण प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. ६२ वर्षीय स्वामी चैतन्यानंद सरस्वती (Swami Chaitanyanand Saraswati) उर्फ पार्थ सारथी याच्यावर तब्बल १७ विद्यार्थिनींनी शारीरिक आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. प्रकरण उघड झाल्यापासून तो फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

“बेबी, आय लव्ह यू” असे मेसेज :

एफआयआरनुसार, स्वामी चैतन्यानंद रात्री उशिरा विद्यार्थिनींना खोलीत बोलावत असे. मोबाईलवरून तो “बेबी, आय लव्ह यू, तू आज खूप सुंदर दिसतेस, माझ्या जवळ ये” असे मेसेज पाठवत असे. नकार दिल्यास प्राध्यापकांमार्फत दबाव आणणे, उपस्थिती कमी दाखवणे किंवा परीक्षेत कमी गुण देण्याची धमकी देणे अशी मानसिक छळाची मालिका तो सुरू ठेवत असे.

एका विद्यार्थिनीने सांगितले की, तिच्या पायाला फ्रॅक्चर झाल्यानंतर तिने एक्स-रे रिपोर्ट व्हॉट्सअॅपवर पाठवला, तेव्हा त्याने “आज खूप सुंदर दिसतेस” असा मेसेज केला.

Swami Chaitanyanand Case | जबरदस्तीचे वर्तन :

एफआयआरमध्ये नमूद आहे की, होळीच्या दिवशी त्याने विद्यार्थिनींना एका रांगेत उभे करून “हरी ओम” म्हणत त्यांच्यासमोर नतमस्तक होण्यास सांगितले. त्यानंतर कपाळावर आणि गालावर रंग लावताना एका विद्यार्थिनीला जबरदस्तीने स्पर्श केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

स्वामी चैतन्यानंदाने वसतिगृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मुलींच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली होती. हे फुटेज तो थेट आपल्या मोबाईलवर पाहत असे. या वसतिगृहात सुमारे ७५ आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थिनी राहत असल्याचे तपासात स्पष्ट झाले. (Swami Chaitanyanand Location)

मुंबईत सापडलं शेवटचं लोकेशन :

विद्यार्थिनींनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर स्वामी चैतन्यानंद फरार झाला. पोलिस तपासात त्याचे शेवटचे लोकेशन मुंबईमध्ये आढळले आहे. त्याला पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली असून देशाबाहेर पळ काढू नये म्हणून लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

News title : Delhi Ashram Case: Swami Chaitanyanand’s Last Location Traced to Mumbai | Accused of Harassing 17 Students

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now