‘त्या’ दिवशी काय घडलं? दीनानाथ रुग्णालयाच्या डीनने सांगितला घटनाक्रम, म्हणाले ‘संबंधित कुटुंबाने…’

On: April 7, 2025 7:17 PM
dr. dhananjay kelkar
---Advertisement---

Deenanath Mangeshkar | पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधून एक धक्कादायक आणि दुःखद घटना समोर आली आहे. प्रसुतीसाठी दाखल झालेल्या एका महिलेला उपचाराआधी तब्बल १० लाख रुपयांचं डिपॉझिट मागण्यात आलं, ज्यामुळे उपचार विलंबित झाले आणि महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

अडीच लाखांचं डिपॉझिट-

सदर महिला प्रसूतीसाठी रुग्णालयात (Deenanath Mangeshkar) दाखल झाली होती. मात्र रुग्णालय प्रशासनाने कुटुंबाकडे दहा लाख रुपयांचं डिपॉझिट मागितल्याने त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. कुटुंबीयांनी अडीच लाख रुपये तातडीनं भरायला तयार असल्याचं स्पष्ट केलं, पण तरीदेखील रुग्णालयात अॅडमिट न केल्याचा आरोप आहे. यामुळे वेळेवर उपचार न झाल्याने संबंधित महिलेचा मृत्यू झाला.

या प्रकारानंतर राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, या प्रकरणाचा अहवाल राज्य शासनाने तयार केला आहे. या अहवालात रुग्णालयाचाच दोष असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, तो संचालक डॉ. धनंजय केळकर यांच्याकडे सुपूर्त केला आहे.

डिपॉझिटबाबत डॉ. केळकर यांचा खुलासा

या घटनेनंतर डॉ. धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं. “आमच्या हॉस्पिटलमध्ये (Deenanath Mangeshkar) डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही. पण डॉक्टरांच्या मनात काय आलं कोण जाणे, त्यांनी १० लाख रुपयांचं डिपॉझिट नमूद केलं,” असं त्यांनी सांगितलं.

केळकर पुढे म्हणाले, “माझ्याशी संबंधित कुटुंबाने संपर्क साधला. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे एवढी रक्कम नाही, म्हणून मी विचारलं की किती आहे, तर त्यांनी अडीच लाख सांगितलं. मी त्यांना सांगितलं की ती रक्कम भरा, बाकी मी सांगतो त्या सूचना ते पाळतील. मी हजारो शस्त्रक्रिया केल्या, पण आजवर मी कुणालाही असं काही लिखित दिलं नाही.”

या प्रकारातील डिपॉझिट मागणं वैयक्तिक डॉक्टरांच्या चर्चेनंतर झालं असल्याचं ते म्हणाले. “सर्वसाधारणपणे बिलिंग विभाग आणि डॉक्टरांमधील समन्वयानंतरच डिपॉझिट ठरवलं जातं. हे केवळ निवडक प्रकरणांमध्येच केलं जातं,” असा खुलासा डॉ. केळकर यांनी केला.

News Title – deenanath mangeshkar din give statement

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now