Kamal Pardeshi | अंबिका मसाला जगभर पोहोचवणाऱ्या कमल परदेशींचं निधन!

On: January 2, 2024 7:14 PM
Kamal Pardeshi
---Advertisement---

पुणे | अंबिका उद्योग समूहच्या माध्यमातून घरात घरात पोहोचलेल्या कमल परदेशी (Kamal Pardeshi) यांचं निधन झालं आहे. ब्लड कॅन्सर झाल्याने पुण्यातील ससून रुग्णालयात वयाच्या 63 व्या वर्षी कमल परदेशी यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. दौंड तालुक्यातील खुटबाव या गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Kamal Pardeshi यांचं निधन

कमल परदेशी यांनी 2000 साली खुरपणीच्या कामातून दररोज मिळणाऱ्या पैशातून  मसाला व्यवसाय सुरू केला. कमलताईंनी  मसाल्याच्या व्यवसायाची सुरुवात आपल्या झोपडीतूनच सुरु केली. आता त्यांच्या मसाल्यांना परदेशात देखील मोठी मागणी आहे.

कमलाताईंच्या अंबिका मसाल्याचा सुगंध नाबार्ड बँकेपर्यंत गेला. नाबार्डच्या माध्यमातून जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल या मुंबईत आल्या होत्या. त्यावेळी आमचा बचत गट अँजेला मर्केल यांना दाखवण्यासाठी नेला होता. त्यावेळी 14500 रुपयांचा चेक त्यांनी कमलाताईंना दिला होता

Kamal Pardeshi यांनी मसाला देशा-परदेशात पोहचवला

कमल ताईंचा प्रवास हा शेत मजूर ते यशस्वी उद्योजिका असा झाला होता. बचत गटांच्या महिलांना घेऊन त्यांनी ‘अंबिका मसाला’ देशा-परदेशात पोहचवला होता. आदर्श उद्योजिका सह अनेक पुरस्कार त्यांनी पटकावले होते.

महत्त्वाच्या बातम्या- 

Post Office | पोस्टाची जबरदस्त योजना; म्हातारपण जाईल आरामात

Gautami Patil | गौतमी पाटीलच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर!

Business Loan | व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देतं ‘इतके’ लाख रूपये, असा करा अर्ज

Farmer | शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; सरकारने घेतला मोठा निर्णय

Janhvi Kapoor चा बॉयफ्रेंडबाबत मोठा खुलासा; भर कार्यक्रमात घेतलं नाव, पाहा व्हिडीओ

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now