काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, कारचा चक्काचूर, एकाच कुटुंबातील…

On: March 31, 2024 4:26 PM
---Advertisement---

Accident | एक धडकी भरवणारा अपघात (Accident) घडला आहे. स्कॉर्पिओ गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. सकाळी सहा वाजता अपघात (Accident) झाला. स्कॉर्पिओची खांबाला इतकी भीषण धडक झाली की यात गाडीचा चक्काचूर झाला आहे.

काळजाचा ठोका चुकवणारा अपघात

उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये हा अपघात झाला. अपघातात तीन महिला, एक पुरुषासह चौघांचा मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आलीय. अपघातात मृत्यू झालेले डेहराडूनचे आहेत.

एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

मुरादाबादमधील मुगलपुरा इथं नातेवाईकांकडे ते निघाले होते. पोलीसांनी सांगितले की, चालकाला झोप आल्याने हा अपघात झाला. संगीता रस्तोगी, आशिका रस्तोगी, यश रस्तोगी, आरती रस्तोगी अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.चालक आणि एक जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उत्तर प्रदेशात तीन दिवसांपूर्वी बांदा इथं भीषण अपघात झाला होता. या अपघातात सासरा आणि जावयाचा मृत्यू झाला होता. भरधाव बोलेरोने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात दोघेही जागीच ठार झाले होते

महत्त्वाच्या बातम्या- 

फक्त अशी घरं पाहून मारायचे डल्ला, मुंबईच्या चोरट्यांची पुण्यातल्या घरांवर वक्रदृष्टी

“राहुल गांधींनी चित्रपट पाहावा, मी स्वतः माझ्या खर्चाने थेअटर बुक करेन”

आयपीएलमुळे एकाचा बळी; अत्यंत धक्कादायक घटना समोर

‘या’ 5 लोकांशी ठेवू नका जास्त मैत्री, अन्यथा…

नोव्हेंबरमध्ये राजीनामा अन् पुन्हा बाबरची एन्ट्री, आफ्रिदीची हकालपट्टी; PCB चा मोठा निर्णय!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now