DC vs KKR | दिल्ली कॅपिटल्स आज कोलकाता नाईट रायडर्ससोबत भिडणार!

On: April 3, 2024 4:36 PM
DC vs KKR match today IPL 2024
---Advertisement---

DC vs KKR | कोलकाता नाइट रायडर्स संघाला आज (3 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सचे (DC) आव्हान असेल. दिल्लीने रविवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला 20 धावांनी नमवले होते. त्यांची गाठ आता कोलकाता संघाशी असणार आहे. दिल्लीने आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांत एकच विजय मिळवला असून ते गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहेत.

दुसरीकडे कोलकाता दोन विजयांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोलकाता विजयी निर्धाराने मैदानात उतरेल. कोलकाताचे सलामी फलंदाज फिल सॉल्ट, अष्टपैलू आंद्रे रसेल व व्यंकटेश अय्यर हे चांगल्या लयीत आहे. त्यामुळे दिल्लीपुढे या खेळाडूंचे तगडे आव्हान असेल.

DC vs KKR सामना रंगणार

कर्णधार श्रेयस अय्यरने बंगळूरुविरुद्ध उत्तम खेळी केली आहे, जी संघाच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. रिंकू सिंहदेखील आक्रमक खेळ करण्यास सक्षम आहे. तर, ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर व पृथ्वी शॉ यांच्यावर दिल्लीला चांगली सुरुवात देण्याची जबाबदारी असेल. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने गेल्या सामन्यात 32 चेंडूंत 51 धावांची खेळी केली होती. त्यामुळे आज त्याच्यावरही नजर असेल.

दरम्यान, कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना आज 3 एप्रिलरोजी 7:30 वाजता विशाखापट्टणम येथील डॉ.वाय.एस.राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सवर आणि जियो सिनेमावर लाईव्ह पाहता येईल.

DC vs KKR संभाव्य प्लेयिंग 11

DC Predicted XI : पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत (c and wk), मिचेल मार्श, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, मुकेश कुमार, खलील अहमद.

KKR Predicted XI : फिल सॉल्ट (wk), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (c), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा.

News Title- DC vs KKR match today IPL 2024

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! वसंत मोरे यांना ‘या’ पक्षाकडून उमेदवारी जाहीर

रवि राणांचा बच्चू कडूंवर पलटवार, थेट डोनाल्ड ट्रम्पशी केली तुलना, म्हणाले…

“रोहित शर्माला पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार करा”

“तो डाव अशोक चव्हाण यांचाच”; काँग्रेस नेत्याच्या आरोपाने खळबळ

निवडणूक काळात WhatsApp मेसेज पाठवताना काळजी घ्या, नाहीतर तुमच्यावर होऊ शकते कारवाई

Join WhatsApp Group

Join Now