Robinhood Movie | ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर (David Warner) याला इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या लिलावात कोणत्याही संघाने संधी दिली नाही. त्याच्या चाहत्यांसाठी ही मोठी धक्कादायक गोष्ट ठरली. मात्र, क्रिकेटच्या मैदानावर संधी न मिळालेल्या वॉर्नरसाठी आता एक मोठी आनंदाची बातमी आहे. डेव्हिड वॉर्नर लवकरच तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. (Robinhood Movie)
डेव्हिड वॉर्नर ‘रॉबिनहुड’ चित्रपटातून करणार मोठ्या पडद्यावर एंट्री
डेव्हिड वॉर्नर आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी जितका प्रसिद्ध आहे, तितकाच तो सोशल मीडियावरही चर्चेत असतो. त्याच्या रिल्स भारतीय चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. विशेषतः तो दक्षिण भारतीय गाण्यांवर नृत्य करून चाहत्यांची मने जिंकतो. त्याच्या या स्टाईलचा चाहता दिग्दर्शक एस.एस. राजामौली (S.S. Rajamouli) सुद्धा झाला होता, ज्यामुळे त्यांनी वॉर्नरसोबत एक जाहिरात देखील केली होती.
अशात तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते मॅथ्री मूव्ही मेकर्स यांनी आपल्या आगामी चित्रपट ‘रॉबिनहुड’मध्ये (Robinhood) वॉर्नरला मोठ्या पडद्यावर लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘या’ दिवशी होणार चित्रपट रिलीज
‘रॉबिनहुड’ चित्रपटाचे दिग्दर्शन वेंकी कुडुमुला (Venky Kudumula) करत आहेत. वॉर्नरची दक्षिण भारतात मोठी फॅन फॉलोइंग आहे, कारण तो आयपीएलमध्ये अनेक वर्षे सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाकडून खेळला आहे आणि काही काळ संघाचा कर्णधारही राहिला आहे.
खरे तर ‘रॉबिनहुड’ 25 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार होता, पण ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) मुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. निर्माते रविशंकर यांनी एका प्रमोशनल कार्यक्रमात सांगितले की, वॉर्नरच्या सहभागाबद्दल त्यांनी आतापर्यंत गोपनीयता राखली होती. आता हा चित्रपट 28 मार्च 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Robinhood Movie)
Title : David Warner South Cinema Debut in Robinhood Movie






