‘बसमध्ये आधी तरुणी चढली आणि नंतर…’ ; आरोपीच्या वकिलाचा खळबळजनक खुलासा!

On: February 28, 2025 8:14 PM
datta gade
---Advertisement---

Dattaray Gade | पुण्यातील स्वारगेट बस डेपो येथे २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याला पुणे पोलिसांनी गुणाट (Gunat) गावातून अटक केली. आज त्याला सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता, १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपीच्या वतीने साजिद शाह (Sajid Shah) आणि वाजीद खान बिडकर (Wajid Khan Bidkar) या वकिलांनी त्याची बाजू मांडली. सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी गाडे निर्दोष असल्याचा दावा केला.

वकिलांचा दावा आरोपी गुन्हेगार नाही-

वकील वाजीद खान (Wajid Khan) यांनी सांगितले की, दत्तात्रय गाडे हा कोणताही सराईत गुन्हेगार नाही. त्याच्यावर चोरीच्या काही तक्रारी दाखल असल्या, तरी त्या सिद्ध झालेल्या नाहीत. या प्रकरणात बलात्काराची घटना पहाटे ५.४५ वाजता घडल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, पीडित तरुणीने प्रतिकार किंवा मदतीसाठी आरडाओरड का केली नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे या घटनेत बळजबरीचा प्रकार झाल्याचे स्पष्ट दिसत नाही. न्यायालयाने हा मुद्दा लक्षात घेत आरोपीला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

आरोपीचा बचाव – संमतीनेच प्रकार घडला?

आरोपीच्या वकिलांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला की, त्यांनी आरोपीशी चर्चा केली असता, त्याने सांगितले की बसमध्ये आधी पीडित तरुणी चढली आणि नंतर तो गेला. त्यानंतर जे काही घडले, ते दोघांच्या संमतीने झाले.

जर हा प्रकार संमतीने घडला असेल, तर आरोपीने पळ काढण्याची गरज का पडली, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, वकिलांनी त्यावर कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही. तसेच, पोलिसांनी आरोपी गाडेच्या भावालाही ताब्यात घेतले असून, तो हुबेहूब गाडेसारखा दिसतो, त्यामुळे तपासाअंती अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

News Title : dattaray gade advocate gives big statement

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now