मोठी बातमी! शिंदे गटाच्या आमदारांमध्ये हाणामारी

On: March 4, 2024 9:10 AM
Dada Bhuse vs mahendra thorve
---Advertisement---

Dada Bhuse vs mahendra Thorve | विधिमंडळामध्ये अर्थसंकल्पाचा आजचा शेवटचा दिवस आहे. यादिवशी राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत राज्य अर्थमंत्री घोषणा करत असताना विधिमंडळामध्ये राडा झाला आहे. शिवसेना शिंदे गटातील नेत्यांमध्ये हा राडा झाला आहे. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे (Dada Bhuse vs mahendra Thorve) यांच्यामध्ये हमरीतुमरी पाहायला मिळाली. यामध्ये मंत्री संभुराज देसाई यांनी मध्यस्थी करत त्यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. (Dada Bhuse vs mahendra Thorve)

आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे (Dada Bhuse vs mahendra Thorve) यांच्यामध्ये खडाजंगी पाहायला मिळाली आहे. या राड्यामुळे आता शिंदे गटामध्ये देखील मतभेद असल्याचं पाहायला मिळालं आहे. यामुळे विधिमंडळामध्ये वातावरण चांगलंच तापलं आहे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घडलेल्या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाले आव्हाड? 

जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळामध्ये सुरू असलेल्या महेंद्र थोरवे आणि दादा भुसे (Dada Bhuse vs mahendra Thorve) यांच्यातील राड्यावर भाष्य केलं आहे. पोलिसांनी विधिमंडळामध्ये येऊ नये अशी प्रथा आहे. तसेच मंत्र्यांमध्ये आणि आमदारांमध्ये हमरातुमरीवर येणं धक्कादायक आहे. वरिष्ठांनी लहानांना कसं वागवावं. महेंद्र थोरवे आणि माझे चांगले संबंध आहे. विधानसभेमध्ये असं होऊ नये असं प्रामाणिक मत आहे, असं ते म्हणालेत.

नाना पटोलेंचं वक्तव्य

भाजपने आखाडा तयार केला आहे. जनतेच्या प्रश्नावर बोलण्याऐवजी स्वत:च्या लॉबीवर भिडले गेले आहेत. हा खोक्याचा प्रकार आहे हा लाजिरवाना प्रकार असल्याचं काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले आहेत.

प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया

आचारसंहितेआधी कामं करू द्या. बाहेर घडलेल्या गोळीबाराचा इथं संबंध लावू नये. तसेच दादा भुसे हे दिघेंपासून एकनिष्ठ असल्याचं बोललं जात आहे. गोळीबाराचा घडलेल्या प्रकाराची तुलना कशाशीही करणं योग्य नाही, असं प्रताप सरनाईक म्हणाले आहेत.

News Title – Dada Buse Vs Mahendra Thorve Fight

महत्त्वाच्या बातम्या

आमदार संजय गायकवाड यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल!

‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा महत्वाचा इशारा

महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल; जाणून घ्या आजचे भाव

मोठी गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा

कोल्हापूरच्या राजकारणातून मोठी बातमी समोर, आता…

Join WhatsApp Group

Join Now