सरकारी कर्मचाऱ्यांनो आठवा वेतन आयोग लागू होण्याआधी तब्बल ‘इतक्या’ वेळा महागाई भत्ता वाढणार

On: November 20, 2025 12:30 PM
8th Pay Commission
---Advertisement---

8th Pay Commission | केंद्र सरकारकडून आठव्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाल्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. जानेवारी महिन्यात केंद्राने आठवा वेतन आयोग जाहीर केला होता आणि 3 नोव्हेंबर 2025 रोजी मोदी सरकारकडून या आयोगाला अधिकृत मंजुरी देण्यात आली. यानंतर आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सलाही हिरवा कंदील मिळाला असून याबाबतच्या पुढील प्रक्रिया जलदगतीने सुरू आहेत. (8th Pay Commission)

दरम्यान, वेतन आयोगाच्या तीन सदस्यीय समितीला पुढील शिफारशी तयार करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचारीवर्गाच्या पगारवाढीबाबतचा निर्णय 2027 अखेर अंतिम होण्याची शक्यता आहे. मात्र, यापूर्वीच कर्मचाऱ्यांना मोठी गोड बातमी मिळणार असल्याचे माहितीनुसार स्पष्ट होत आहे.

आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपूर्वी मिळणार महत्त्वाचा लाभ :

मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल 2027 पर्यंत आयोगाच्या शिफारशी सरकारकडे जमा होतील. त्यानंतर वर्षाअखेरीस म्हणजेच 2027 च्या अखेरीस आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता असल्याचे संकेत आहेत. परंतु, ज्या कर्मचाऱ्यांना जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू होणार आहे, त्यांना या कालावधीतील थकबाकीचा लाभ देण्यात येणार आहे.

याबाबत अनेक जणांचा प्रश्न होता की 31 डिसेंबर 2025 रोजी सातवा वेतन आयोग समाप्त होत असताना त्यानंतर मिळणाऱ्या महागाई भत्ता वाढीचा फायदा कोणत्या आयोगात मिळणार? याबाबत स्पष्ट माहिती अशी आहे की आठवा वेतन आयोग लागू होईपर्यंत महागाई भत्ता वाढ सातव्या वेतन आयोगाच्या नियमांनुसारच मिळत राहणार आहे. (8th Pay Commission)

8th Pay Commission | तीन वेळा वाढणार महागाई भत्ता; कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा :

महागाई भत्ता दर सहा महिन्यांनी वाढवला जात असल्याने पुढील 18 महिन्यांच्या कालावधीत केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना तीन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये DA वाढीचा लाभ मिळणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू होण्यापूर्वीच मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 58% दराने महागाई भत्ता दिला जातो. पुढील तीन वाढी दरवेळी सरासरी तीन टक्के जरी झाली, तरी हा महागाई भत्ता 67% पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी एका वर्षात आणि त्यानंतर आणखी सहा महिन्यांत कर्मचाऱ्यांच्या पगारात महत्त्वपूर्ण वाढ होऊ शकते.

News Title: Big Update for Central Government Employees: DA to Increase Three Times Before Implementation of 8th Pay Commission

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now