पाकिस्तानची नवीन कुरापत; भारताचं टेन्शन वाढणार?

On: May 10, 2025 3:09 PM
Cyberattack
---Advertisement---

Cyberattack | पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात “ऑपरेशन सिंदूर” (Opration Cyberattack) सुरू केल्यानंतर सायबर पातळीवर संघर्षाची नवी फाटी उघडली गेली आहे. सीमारेषेवर तणाव वाढत असतानाच, सायबर आघाडीवर भारताविरोधात सुरू असलेल्या हल्ल्यांमध्येही वाढ झाली आहे. महाराष्ट्र राज्य सायबर विभागाच्या माहितीनुसार, यामध्ये डीडीओएस (DDoS) हल्ले, डिजिटल डिफॉर्मेशन मोहिमा आणि पायाभूत सेवांवर दहशतीचे प्रयत्न दिसून आले आहेत. (Cyberattack)

नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा :

सायबर गुन्हेगार केवळ सरकारी यंत्रणांवर नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांवरही लक्ष केंद्रित करत आहेत. सरकारी कागदपत्रांच्या स्वरूपात बनावट फाइल्स पाठवून नागरिकांच्या डिव्हाइसेसवर दुर्भावनायुक्त सॉफ्टवेअर डावलले जात आहे. (Cyberattack)

अशा फाइल्स एकदा उघडल्या की, त्या डिव्हाइसवर अनधिकृत नियंत्रण मिळवू शकतात. यामुळे डेटा चोरी, सिस्टीम हॅकिंग आणि संपूर्ण नेटवर्कला धोका निर्माण होतो.

Cyberattack | सर्व पातळीवर उपाययोजना सुरू :

या धोकादायक स्थितीत महाराष्ट्र सायबर विभागाने (Maharashtra Cyberattack) नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही अनोळखी मेलमधील अटॅचमेंट्स उघडण्याआधी खात्री करावी, फक्त अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या लिंक्स आणि फाइल्सच उघडाव्यात, असा सल्ला दिला आहे. सायबर सुरक्षेसाठी अद्ययावत अँटीव्हायरस, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि नियमित सिस्टीम स्कॅन करणे गरजेचे आहे.

भारताच्या महत्वाच्या पायाभूत यंत्रणांवर सायबर हल्ल्यांमुळे केंद्र सरकार अधिक जागरूक झाले असून, संभाव्य सायबर युद्धाला तोंड देण्यासाठी सर्व पातळीवर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानकडून सुरु असलेल्या या डिजिटल कुरापतींचा वेळीच बंदोबस्त केल्यास देशाच्या सुरक्षेला धोका होण्यापासून वाचवता येणार आहे.

News Title: Cyberattacks Surge Against India Amid Tensions With Pakistan, “Operation Sindoor” Triggering Digital Retaliation

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now