‘मोदींना गरिबाच्या वेदना ऐकू येत नाही’; जरांगे पाटलांची टीका

On: October 25, 2023 3:36 PM
---Advertisement---

जालना | मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) तिढा आणखीन सुटलेला नाही. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा आंदोलनाला बसले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधला.

मोदींना आम्ही फक्त आवाहन केलं होतं. आमचं आरक्षण आम्हाला द्या. त्यांनी जर राज्याला सांगितलं तर आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आरक्षण इथे येईल. त्यामुळे आम्ही त्यांना हाक मारली होती. पण त्यांना ती ऐकू आली नाही असं वाटतंय. गरिबांच्या वेदना मोदींना ऐकू येत नाही असं वाटतंय, असं सांगत मनोज जरांगे पाटलांनी नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका केली.

सभेदरम्यान काही मराठा तरुण अपघातात जखमी झाले, त्यांच्यासाठी देखील कुठलीच भूमिका सरकारने घेतली नाही. आत्ताच गिरीश महाजन यांचा फोन आला. या मागण्या मार्गी लावू असं त्यांनी म्हटलं. मात्र अद्याप त्यांनी निर्णय घेतला नाही, अशी खंत जरांगेंनी व्यक्त केलीये.

आम्ही सगळ्या पक्षांचा मानपान ठेऊन त्यांना एका महिन्याचा वेळ देऊन सन्मान केला होता. कालपर्यंत आम्हाला अपेक्षा आणि आशा असताना सुद्धा सरकारने ती पूर्ण केली नाही. सरकारने जे गुन्हे दाखल केले होते, ते आज 41 व्या दिवशीही मागे घेण्यात आले नाही, असं जरांगे पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now